कमाई करायची असेल तर समजून घ्या गणित; ज्वेलरी की Gold ETF, कुठे मिळू शकतो बंपर रिटर्न?
By जयदीप दाभोळकर | Updated: March 29, 2025 09:30 IST
1 / 8Gold vs Gold ETF: सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. अशा तऱ्हेनं कमाई करायची असेल तर आधी फिजिकल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ कशात जास्त नफा होतो हे समजून घ्यावे लागेल. भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोनं नेहमीच आकर्षक मालमत्ता राहिली आहे. 2 / 8फिजिकल स्वरूपात असो किंवा गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून, गुंतवणूकदारांनी याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं आहे. गेल्या १० आणि १५ वर्षांतील गोल्ड आणि गोल्ड ईटीएफची कामगिरी पाहिली तर फिजिकल गोल्डनं चांगला परतावा दिल्याचं स्पष्ट होतं.3 / 8मार्च २०१५ मध्ये सोन्याचा भाव २६,३४० रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो मार्च २०२५ पर्यंत वाढून ८८,९९६ रुपये झाला. त्यामुळे सोन्यानं १० वर्षांत १२ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (CAGR) दिला.4 / 8२०१० मध्ये सोन्याचा भाव १८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आता ८८,९९६ रुपये झालाय. म्हणजेच सोन्यानं १५ वर्षांत १७.०१% सीएजीआर दिलाय.5 / 8गोल्ड ईटीएफनं गेल्या १० वर्षांत सरासरी ११.४४ टक्के सीएजीआर दिला आहे. गोल्ड ईटीएफनं १५ वर्षांत सरासरी १०.८० टक्के सीएजीआर परतावा दिलाय.6 / 8गरज भासल्यास बँका किंवा वित्तीय संस्थांकडून सोनं तारण ठेवून कर्ज घेता येतं. ऐतिहासिकदृष्ट्या, भौतिक सोन्यानं उच्च परतावा दिला आहे, जो गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला आहे. तथापि, ते सुरक्षित ठेवण्यासाठी, लॉकर आवश्यक आहे, ज्यामुळे अतिरिक्त खर्च येतो. भेसळयुक्त सोनं बाजारात सहज उपलब्ध असल्यानं खरेदीदारांचं नुकसान होऊ शकतं. बीआयएस हॉलमार्क पाहूनच खरेदी करावी. आणखी एक गोष्ट म्हणजे अचानक विक्री केल्यास योग्य किंमत मिळणं कठीण होऊ शकतं, विशेषत: दागिन्यांच्या बाबतीत, जेथे मेकिंग चार्ज परत केला जात नाही.7 / 8इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यानं चोरी किंवा साठवणुकीची चिंता नाही. स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून केव्हाही त्याची खरेदी-विक्री करता येते. फिजिकल गोल्डच्या तुलनेत मेकिंग चार्ज किंवा प्युरिटी प्रॉब्लेम नाही. गेल्या १५ वर्षांत गोल्ड ईटीएफनं फिजिकल गोल्डपेक्षा कमी परतावा दिलाय. गोल्ड ईटीएफमध्ये फंड मॅनेजमेंट फी आणि इतर चार्जेस असतात, ज्यामुळे परतावा थोडा कमी होऊ शकतो.8 / 8(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)