PPF मध्ये वर्षाला ₹१ लाख जमा केले तर २५ वर्षांनंतर किती रक्कम मिळणार, गुंतवणूकीपूर्वी चेक करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:33 IST
1 / 6PPF Investment : पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारी गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ ही केंद्र सरकारद्वारे चालविली जाणारी योजना असून यात कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. देशातील कोणत्याही बँकेत पीपीएफ खाते उघडता येतं. 2 / 6बँकांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसमध्येही तुम्ही पीपीएफ खातं उघडू शकता. पीपीएफ खात्यात तुम्ही वर्षाकाठी ५०० ते १.५ लाख रुपये जमा करू शकता. या अकाऊंटबद्दल अनेक खास गोष्टी आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात वार्षिक एकरकमी गुंतवणूक करू शकता किंवा हप्त्यांमध्ये पैसेही जमा करू शकता.3 / 6केंद्र सरकार सध्या पीपीएफवर ७.१ टक्के वार्षिक व्याज देते. या योजनेत वर्षाला कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १,५०,००० रुपये जमा करता येतात. ही योजना १५ वर्षांत मॅच्युअर होते. परंतु, ही मुदत पाच पाच वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. 4 / 6अशा प्रकारे पीपीएफ खातं जास्तीत जास्त ५० वर्षे चालवता येतं. हे लक्षात ठेवा की पीपीएफ खाते सतत चालवण्यासाठी दरवर्षी किमान ५०० रुपये पीपीएफ खात्यात जमा करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही वर्षभरात किमान ५०० रुपये जमा केले नाहीत तर तुमचं खातं बंद होईल.5 / 6पीपीएफ खात्यावरही कर्जाची सुविधा मिळू शकते. पीपीएफ योजनेमुळे गुंतवणूकदारांना खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. पीपीएफ खातं उघडल्यानंतर ५ वर्षांनंतर तुम्ही एकदा ५० टक्के रक्कम काढू शकता. 6 / 6जर तुम्ही पीपीएफ खात्यात दरवर्षी १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला २५ वर्षांनंतर एकूण ६८,७२,०१० रुपये मिळतील. यात तुमच्या गुंतवणुकीचे २५,००,००० रुपये आणि व्याजाचे ४३,७२,०१० रुपये यांचा समावेश असेल. पीपीएफ योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता.