रिटायरमेंटनंतर कमाईचं साधन नसेल तर SBI करणार मदत, पाहा कसा मिळेल याचा फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 09:42 IST
1 / 6SBI Reverse Mortgage Loan: देशातील बहुतेक ज्येष्ठ नागरिकांकडे वृद्धापकाळात उत्पन्नाचा स्रोत नाही. काही वेळा बचतीअभावी खर्च भागवणं कठीण होतं. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठी बँक SBI तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मॉर्गेज योजना चालवली जात आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या घराच्या किंवा इतर मालमत्तेच्या बदल्यात बँकेकडून दरमहा ठराविक रक्कम दिली जाते.2 / 6या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घराच्या किंवा मालमत्तेच्या बदल्यात बँकेकडून दरमहा ठराविक रक्कम दिली जाते. या योजनेत, दिलेली रक्कम परत केली जाणार नाही, असं बँक गृहीत धरते. मात्र, या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला परतफेडीचा पर्याय दिला जातो. या कारणास्तव, ही योजना अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य मानली जाते ज्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. 3 / 6या योजनेचा लाभ घेतल्यानंतर, मालमत्तेचं मूल्यांकन काही वर्षांनी (५ वर्षांनी) नियमित अंतरानं केलं जातं. यामध्ये, मालमत्ता मूल्याच्या ८० टक्के पर्यंत कर्ज म्हणून उपलब्ध करून दिलं जातं.4 / 6देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेत व्याज देखील समाविष्ट आहे. कर्ज घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यास बँक मालमत्ता विकून कर्जाची रक्कम वसूल करते आणि उर्वरित रक्कम नॉमिनीला दिली जाते.5 / 6६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही संयुक्त खात्यातूनही अर्ज करू शकता, परंतु या प्रकरणात पत्नीचे वय ५८ वर्षांपेक्षा अधिक असणं गरजेचं आहे.6 / 6एसबीआय रिव्हर्स मॉर्गेज योजनेंतर्गत, किमान ३ लाख रुपये आणि कमाल १ कोटी रुपये कर्ज घेता येतं. यामध्ये बँकेकडून १० ते १५ वर्षांसाठी कर्ज दिलं जातं.