शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:17 IST

1 / 6
आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केलेली आणि सप्टेंबर २०२४ पासून लागू झालेली 'एनपीएस वात्सल्य योजना' आता पालकांना दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी देत आहे.
2 / 6
ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टमचाच एक भाग आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे आहे.
3 / 6
एनपीएस वात्सल्य ही विशेषतः मुलांसाठी तयार केलेली एक निवृत्ती बचत योजना आहे, जी पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे संचालित आहे. पालक किंवा कायदेशीर पालक आपल्या मुलांच्या नावावर हे खाते उघडू शकतात आणि नियमित योगदान देऊन त्यांच्यासाठी मोठा फंड तयार करू शकतात. मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर हे खाते आपोआप सामान्य टियर-I एनपीएस खात्यात रूपांतरित होते, ज्याचे व्यवस्थापन मूल स्वतः करू शकते.
4 / 6
ही योजना ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. आई, वडील किंवा कायदेशीर पालक हे खाते मुलाच्या नावाने उघडू शकतात. या योजनेत किमान वार्षिक गुंतवणूक १,००० रुपये (किंवा ₹८३ प्रति महिना) आहे. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. यामुळे पालकांना त्यांच्या सोयीनुसार मोठी बचत करता येते.
5 / 6
या अकाउंटचा लॉक-इन कालावधी मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत राहतो. लहान वयातच दीर्घकाळची गुंतवणूक सुरू केल्यामुळे, चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळतो आणि निवृत्तीच्या वेळी एक मजबूत पेन्शन फंड तयार होतो. या योजनेतील गुंतवणूक शेअर बाजारातील इक्विटी आणि डेट फंडात गुंतवली जाते.
6 / 6
जुन्या कर प्रणालीनुसार या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते. या योजनेमुळे पालक आपल्या मुलाच्या भविष्यासाठी लहान वयातच आर्थिक पाया मजबूत करू शकतात.
टॅग्स :Investmentगुंतवणूकchildren's dayबालदिनMONEYपैसाshare marketशेअर बाजार