By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 08:36 IST
1 / 9Mahindra Scorpio-N On EMI: भारतीयांच्या मनावर राज्य करणारी 'Big Daddy of SUVs' म्हणजेच महिंद्रा स्कॉर्पिओ-N आज प्रत्येक तरुण आणि कुटुंबाची पहिली पसंती बनली आहे. या कारचे अनेक चाहते आहेत. तसंच ही कार जेव्हा लाँच झाली तेव्हा याला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळाली होती.2 / 9पण फक्त पसंती असणे पुरेसे आहे का? ही गाडी घरी आणण्यासाठी तुमच्या बँक खात्याची स्थिती कशी असावी आणि तुमच्या मासिक उत्पन्नाचे गणित काय असावं, हे आपण सविस्तर समजून घेऊया.3 / 9स्कॉर्पिओ-N ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹१४ लाखांपासून सुरू होऊन ₹२५ लाखांपर्यंत (टॉप मॉडेल) जाते. जर आपण याच्या सर्वात लोकप्रिय Z4 किंवा Z6 डिझेल व्हेरियंटबद्दल बोललो, तर ऑन-रोड किंमत (विमा, आरटीओ आणि इतर करांसह) सुमारे ₹१८ लाख ते ₹२० लाखांच्या दरम्यान असते.4 / 9समजा तुम्ही स्कॉर्पिओ-N चं एक मिड व्हेरियंट निवडलं ज्याची ऑन-रोड किंमत ₹१९ लाख आहे. तर यासाठी तुम्हाला डाउन पेमेंट किती करावं लागेल हे पाहू. सुरक्षित आर्थिक नियोजनासाठी तुम्ही किमान २०% म्हणजेच ₹३.८० लाखांचं डाउन पेमेंट केलं पाहिजे.5 / 9तर यासाठी तुम्हाला उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात घ्यावी लागेल. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून एकूण ₹१५.२० लाखांचं कर्ज घ्यावं लागेल.6 / 9किती असू शकतो व्याजदर आणि कालावधी? जर तुम्ही ९.५% सरासरी व्याजदरानं ५ वर्षांसाठी (६० महिने) कर्ज घेतलं, तर तुमचा मासिक EMI सुमारे ₹३१,९०० असेल.7 / 9आर्थिक जगतात एक 'थंब रुल' आहे - २०/४/१० चा नियम. याचा अर्थ असा की, तुमच्या कारचा EMI तुमच्या इन-हँड सॅलरीच्या २५% ते ३०% पेक्षा जास्त नसावा. जर तुमचा EMI ₹३२,००० असेल, तर तुमचा मासिक इन-हँड पगार किमान ₹१ लाख ते ₹१.२० लाख असावा. 8 / 9यामुळे कारचा हप्ता भरल्यानंतरही तुमच्याकडे घरखर्च, गुंतवणूक आणि आपत्कालीन निधीसाठी पुरेसे पैसे शिल्लक राहतील. तुमच्यावर दुसरं कोणतेही कर्ज (उदा. होम लोन किंवा पर्सनल लोन) नसेल, तर ₹८०,००० पगारावरही तुम्ही जोखीम घेऊ शकता, परंतु हे थोडे तणावपूर्ण असू शकतं.9 / 9परंतु काही छुपे खर्च विसरू नका. कार घेतल्यानंतर तुम्हाला फक्त EMI भरणं पुरेसं नाही. स्कॉर्पिओ-N सारख्या मोठ्या SUV सोबत इतर खर्चही येतात. जसं की इंधन. महिन्यात १,००० किमी प्रवासासाठी सुमारे ₹८,०००-₹१०,००० खर्च येऊ शकतो. मेंटेनन्स: वार्षिक सर्व्हिसिंग आणि विमा नूतनीकरणासाठी दरमहा ₹२,०००-₹३,००० वेगळे ठेवावे लागतील.