गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:04 IST
1 / 9जर तुम्ही होमलोन ९% व्याजदराने आणि २० वर्षांच्या कालावधीसाठी घेत असाल, तर तुमच्या कर्जाचा मासिक हप्ता (EMI) किती येईल आणि त्यासाठी तुमचा पगार किती असावा, याचा एक अंदाज इथे दिला आहे.2 / 9जर तुम्हाला १० लाख रुपयांचं गृहकर्ज हवं असेल, तर तुमचा मासिक हप्ता (EMI) सुमारे ८,९९७ रुपये येईल. यासाठी तुमचा किमान मासिक पगार २२,५०० रुपये असणं गरजेचं आहे.3 / 9२० लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी तुमचा EMI सुमारे १७,९९४ रुपये असेल. यासाठी तुमचा किमान पगार ४५,५०० रुपये असावा लागतो.4 / 9३० लाखांसाठी तुमचा पगार ६७,५०० रुपये, तर ४० लाखांसाठी ९०,००० रुपये आवश्यक आहे. जर तुम्ही ५० लाखांचं कर्ज घेत असाल, तर तुमचा किमान पगार १,१२,५०० रुपये असावा.5 / 9६० लाखांसाठी १,३५,००० रुपये, ७० लाखांसाठी १,५७,५०० रुपये आणि ८० लाखांसाठी १,८०,००० रुपये किमान मासिक पगार असणं आवश्यक आहे.6 / 9९० लाख रुपयांच्या होमलोनसाठी तुमचा EMI सुमारे ८०,९७३ रुपये येईल, आणि यासाठी किमान पगार २,०२,५०० रुपये असावा लागतो.7 / 9जर तुम्ही थेट १ कोटी रुपयांचं होमलोन घेत असाल, तर तुमचा मासिक हप्ता ८९,९७० रुपये असेल. यासाठी तुम्हाला किमान २,२५,००० रुपये मासिक पगार असणं गरजेचं आहे.8 / 9बँका साधारणपणे तुमच्या मासिक पगाराच्या ४०% पेक्षा जास्त EMI नसावा, असा सल्ला देतात. यामुळे तुम्हाला कर्ज फेडणं सोपं जातं.9 / 9हे आकडे तुम्हाला तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती पगाराची गरज आहे, याचा एक स्पष्ट अंदाज देतात. त्यानुसार योग्य आर्थिक नियोजन करून तयारी करणे महत्त्वाचे आहे.