शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:47 IST

1 / 8
NPS Investment Tips: निवृत्तीचं नियोजन (Retirement Planning) प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं. नोकरीनंतरही एक स्थिर उत्पन्न सुरू राहावं, यासाठी आधीपासून तयारी करावी लागते. आज आपण अशाच एका उत्कृष्ट गुंतवणूक पर्यायाबद्दल, एनपीएस (NPS) बद्दल बोलणार आहोत. तुम्ही दरमहा थोडे थोडे पैसे वाचवल्यास, निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा चांगली रक्कम पेन्शन म्हणून कशी मिळू शकते, हे आपण समजून घेऊया.
2 / 8
उदाहरणार्थ, समजा तुमचे वय सध्या ३० वर्षे आहे आणि तुम्ही दरमहा ५००० रुपये तुमच्या एनपीएस खात्यात जमा करता. म्हणजे, वर्षभरात तुम्ही ६०,००० रुपये वाचवत आहात. जर तुम्ही ही गुंतवणूक सलग ३० वर्षांपर्यंत केली, तर तुम्ही एकूण १८ लाख रुपये जमा केले असतील.
3 / 8
आता जर तुम्हाला सरासरी १०% वार्षिक परतावा मिळाला, तर निवृत्तीच्या वेळी तुमचा एकूण कॉर्पस सुमारे १.१३ कोटी रुपये (₹१,१३,९६,६२७) होईल. यापैकी सुमारे ₹९५.९६ लाख रुपये केवळ व्याजातून मिळतील. हीच आहे चक्रवाढ व्याजाची ताकद, जी वेळेनुसार तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवते. आता प्रश्न हा आहे की, निवृत्तीनंतर तुम्हाला या रकमेतून किती पेन्शन मिळेल?
4 / 8
तुम्ही निवृत्त झाल्यावर, तुमच्याकडे दोन पर्याय असतील. एकतर संपूर्ण रकमेतून एन्युटी प्लान खरेदी करून पेन्शन घेणं सुरू करा किंवा एकूण रकमेपैकी ६०% हिस्सा काढून घ्या आणि उर्वरित ४०% एन्युटी प्लानमध्ये गुंतवा. नियमानुसार, एनपीएसमध्ये निवृत्तीच्या वेळी किमान ४०% रक्कम एन्युटीमध्ये गुंतवणे आवश्यक असते.
5 / 8
जर तुमचा एकूण कॉर्पस ₹१.१३ कोटींमधून ४०% म्हणजे ₹४५.५८ लाख रुपये एन्युटीमध्ये गुंतवले आणि त्यावर तुम्हाला ७-८% वार्षिक व्याज मिळालं, तर तुमचं वार्षिक पेन्शन सुमारे ₹३.१९ लाख ते ₹३.६४ लाख रुपयांदरम्यान असेल. म्हणजेच, दरमहा ₹२६,५०० ते ₹३०,४०० रुपयांपर्यंत असेल.
6 / 8
जर तुमची इच्छा असेल तर, तुम्ही संपूर्ण कॉर्पस म्हणजे ₹१.१३ कोटी एन्युटी प्लानमध्ये गुंतवू शकता. अशा परिस्थितीत, तुमची वार्षिक पेन्शन सुमारे ₹७.९७ लाख ते ₹९.११ लाखांपर्यंत बनू शकते. म्हणजेच, दरमहा तुम्हाला सुमारे ₹६६,००० ते ₹७६,००० रुपयांपर्यंतची पेन्शन मिळेल.
7 / 8
हे एका आदर्श स्थितीवर आधारित केलेलं कॅलक्युलेशन आहे. यामध्ये असं मानले गेले आहे की व्यक्तीचं वय ३० वर्षे आहे, त्याची नोकरी स्थिर आहे आणि तो दरमहा नियमितपणे गुंतवणूक करत आहे. जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही तुमचं वय आणि गुंतवणूक रक्कम बदलून तुमच्या अंदाजानुसार पेन्शनची गणना करू शकता. लक्षात ठेवा, जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, निवृत्तीच्या वेळी तुमचा कॉर्पस आणि पेन्शन तेवढीच मोठी असेल. हाच स्मार्ट निवृत्ती नियोजनाचा फंडा आहे.
8 / 8
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंव तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकPensionनिवृत्ती वेतनMONEYपैसा