भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:29 IST
1 / 5नोकरीत गुंतून राहण्यापेक्षा घरबसल्या शेअर ट्रेडिंग करून पैसे मिळवणे हा चांगला पर्याय. परंतु अजिबात अभ्यास न करता या क्षेत्रात उडी मारू नये. यासाठी सुरुवातीला काही गोष्टींचे भांडवल तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. (How much money for full time stock trader)2 / 5 यात भावनिक भांडवल हे सर्वात महत्त्वाचे आहे. यात प्रामुख्याने कितीही दबावाखाली निर्णयाची क्षमता, सातत्याने शिकण्याची तयारी आणि नुकसान सहन करण्याची मानसिकता यांचा समावेश होतो.3 / 5 दुसरे म्हणजे सातत्याने उत्पन्न मिळवण्यासाठी पुरेसे आर्थिक भांडवल गरजेचे असते. उदाहरणार्थ, १० लाखांच्या भांडवलावर दरमहा ५ टक्के नफा गृहीत धरल्यास महिन्याला ५०,००० रुपयांचे उत्पन्न मिळेल. परंतु बाजारात सतत नफा मिळतोच असे नाही.4 / 5फुलटाइम ट्रेडर होण्यासाठी केवळ शेअर बाजाराचे ज्ञान पुरेसे नाही, तर शिस्त, संयम आणि सतत अभ्यास करण्याची वृत्तीही आवश्यक असते. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र फंड गरजेचा आहे.5 / 5नुकसान होण्याची शक्यता गृहित धरून आर्थिक स्थैर्य टिकवण्याची तयारी असावी लागते. तसेच, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचा अभ्यास करून स्वतःची ट्रेडिंग पद्धत विकसित करावी लागते.