शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 19:59 IST

1 / 8
सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत घसरण दिसून येत आहे. शुक्रवारीही 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 120770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. चांदीचाही दर कमी होऊन प्रति किलो 149125 रुपयांवर आला आहे.
2 / 8
तज्ज्ञांच्या मते, पुढच्या वर्षात अर्थात 2026 मध्ये सोन्याचा भाव 156000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. एवढेच नाही तर, सध्या सोन्याचा दर ज्या पातळीवर आहे, खरेदीची चांगली संधी आहे.
3 / 8
17 ऑक्टोबर रोजी सोने 130874 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. यानंतर ते 10104 रुपयांनी खाली आले आहे. दरम्यान, चांदीतही काही दिवसांत 28975 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.
4 / 8
2026 मध्ये सोन्याचा दर कुठपर्यंत जाणार? तज्ज्ञांच्या मते, पुढील वर्षात म्हणजेच 2026 मध्ये सोन्याच्या दरात पुन्हा तेजीचा दिसून येऊ शकते. जगभरातील सेंट्रल बँकांकडून सुरू असलेली मोठ्या प्रमाणात खरेदी आणि अमेरिकेतील व्याजदरात संभाव्य कपात, याचा सोन्याच्या भावावर परिणाम होऊ शकतो. यामुळे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 2026 मध्ये सोने 126000 ते 156000 रुपयां दरम्यान असू शकते.
5 / 8
ब्रोकरेज हाउस एचएसबीसीच्या मते, सोन्याचा दर 144068 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. Goldman Sachs ने 4,900 डॉलर प्रति आउन्स म्हणजेच सुमारे 1,53,000 रुपयांचा अंदाज वर्तवला आहे. तर इकनॉमिक्स टाइम्सच्या एका वृत्तानुसार, जेपी मॉर्गनच्या मते, सोने 125000 रुपयांच्या आसपास राहू शकते.
6 / 8
गुंतवणुकीसाठी योग्य वेळ...? - तज्ज्ञांचे मते, सोन्याचा भाव 123000 रुपयांच्या खाली असताना त्यात गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.
7 / 8
(टीप - सोने आणि चांदीच्या दरात अनेक कारणांमुळे चढ-उतार होत असतात. यामुळे अत्यंत विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. अथवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यायला हवा. आम्ही सोने खरेदीचा अथवा विक्रीचा सल्ला देत नाही.)
8 / 8
(टीप - सोने आणि चांदीच्या दरात अनेक कारणांमुळे चढ-उतार होत असतात. यामुळे अत्यंत विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. अथवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यायला हवा. आम्ही सोने खरेदीचा अथवा विक्रीचा सल्ला देत नाही.)
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMarketबाजारInvestmentगुंतवणूक