PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
By जयदीप दाभोळकर | Updated: August 18, 2025 09:31 IST
1 / 8PF Removal Rules: आजच्या काळात, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची बचत योजना आहे. ही योजना केवळ निवृत्तीसाठी निधी जमा करण्याचं काम करत नाही तर, गरज पडल्यास आर्थिक मदत देखील पुरवते. दरम्यान, पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत, जे पाळणं आवश्यक आहे. हे पैसे काढण्याची संख्या आणि रक्कम दोन्हीवर लागू होते.2 / 8पीएफमधून पैसे दोन प्रकारे काढता येतात: पहिलं म्हणजे अंशतः पैसे काढणं किंवा आगाऊ रक्कम काढणं. कर्मचारी सेवेत असताना हे केलं जातं. तसंच दुसरी पद्धत म्हणजे पूर्ण पैसे काढणं. हे निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर केलं जातं.3 / 8अंशत: पैसे काढण्याचे नियम: साधारणपणे, पीएफ खात्यातून अंशतः पैसे काढण्याची निश्चित संख्या नसते, परंतु प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी एक वैध कारण असणं आवश्यक आहे. तथापि, पैसे काढण्याची संख्या वेगवेगळ्या कारणांमुळे बदलते.4 / 8लग्न किंवा मुलांचं शिक्षण: जर तुम्हाला तुमच्या लग्नासाठी, तुमच्या मुलांच्या किंवा भावंडांच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या मॅट्रिकनंतरच्या शिक्षणासाठी तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर तुम्ही पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला किमान ७ वर्षे सेवा पूर्ण करावी लागेल. यासाठी तुम्ही जास्तीत जास्त तीन वेळा पैसे काढू शकता.5 / 8घर खरेदी करणं, बांधणं किंवा दुरुस्ती करणं : घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एकदाच पैसे काढता येतात. तुम्ही तुमच्या घराच्या दुरुस्तीसाठी देखील पैसे काढू शकता, परंतु यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील. तुम्ही ही सुविधा फक्त एकदाच घेऊ शकता.6 / 8वैद्यकीय आणीबाणी: कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आणीबाणीसाठी पैसे काढण्याची मर्यादा नाही. यासाठी तुम्ही तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा पैसे काढू शकता, परंतु प्रत्येक वेळी तुम्हाला आजाराचा पुरावा द्यावा लागेल.7 / 8संपूर्ण पैसे काढण्याचे नियम: संपूर्ण पीएफ रक्कम फक्त दोन परिस्थितींमध्ये काढता येते. पहिलं कारण म्हणजे निवृत्ती. तुम्ही वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तुमची संपूर्ण पीएफ रक्कम काढू शकता.8 / 8दुसरी परिस्थिती म्हणजे बेरोजगारी: जर तुम्ही नोकरी सोडली आणि सलग दोन महिने बेरोजगार राहिलात तर तुम्ही तुमचा संपूर्ण पीएफ शिल्लक काढू शकता. याशिवाय, एका महिन्याच्या बेरोजगारीनंतर, तुम्ही रकमेच्या ७५% पर्यंत काढू शकता.