२.. ३.. की ५..? एक व्यक्ती किती Credit Card ठेवू शकतो? यासंदर्भात RBI चा आहे का काही नियम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 09:29 IST
1 / 7Credit Card Rules : क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आजकाल सामान्य झाले आहेत. बहुतांश लोकांकडे क्रेडिट कार्ड असतंच. पण आपल्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असावी असं अनेकांना वाटत असतं.2 / 7तसंही वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट कार्ड असतात आणि त्यानुसार त्यावर वेगवेगळे रिवॉर्ड पॉईंट्सही मिळतात. पण कधी कधी तुम्ही असाही विचार केला असेल की एखादी व्यक्ती किती क्रेडिट कार्ड ठेवू शकते? कार्ड ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेचा काही नियम आहे का? चला जाणून घेऊया.3 / 7सर्वप्रथम हे जाणून घ्या की, क्रेडिट कार्ड किती बाळगावी यासाठी रिझर्व्ह बँकेचा कोणताही नियम नाही. आपल्याकडे हवी तितकी क्रेडिट कार्ड तुम्ही बाळगू शकता. खरं तर क्रेडिट कार्ड देण्यापूर्वी तुमची बँक तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड आहेत, तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) काय आहे, तुम्ही त्यांचा वापर कसा करता हे तपासते.4 / 7अशावेळी एक गोष्ट नक्की आहे की जर तुमची कमाई कमी असेल तर तुम्हाला जास्त क्रेडिट कार्ड्स मिळू शकणार नाहीत. पण जर तुम्ही चांगले पैसे कमावत असाल तर अनेक बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड ऑफर करतील.5 / 7इथे अधिक क्रेडिट कार्ड म्हणजे २-४ कार्ड्स नव्हे, तर ८-१० किंवा त्याहूनही अधिक कार्ड्स. अनेक जण अनेकदा सर्व बँकांचे क्रेडिट कार्ड ठेवतात. बहुतेक लोकांना असं वाटतं की यामुळे त्यांचं क्रेडिट लिमिट खूप जास्त होईल. मात्र, अशा परिस्थितीत लोक अनेकदा हे विसरतात की, यामुळे ना त्यांची कमाई वाढेल, ना त्यांची खर्च करण्याची क्षमता. वेगवेगळ्या कार्डवर ऑफर्स मिळतील आणि त्याचा फायदा होईल, असा विचार करून अनेक जण वेगवेगळे क्रेडिट कार्ड ठेवतात.6 / 7काही लोक बॅलन्स ट्रान्सफर म्हणजेच एका कार्डवरून दुसऱ्या कार्डवर पेमेंट करण्याच्या सुविधेसाठी जास्त कार्डही ठेवतात. अधिक क्रेडिट कार्ड असणं नेहमीच त्रासदायक ठरतं. जर तुम्हाला तुमचा खर्च नियंत्रणाबाहेर जाऊ द्यायचा नसेल तर कमीतकमी क्रेडिट कार्ड्स ठेवा. 7 / 7आपण कोणत्या कामासाठी अधिक खर्च करता याचा विचार करून कार्ड ठरवा. जसं सिनेमासाठी वेगळं कार्ड असतं, पेट्रोलसाठी वेगळं, शॉपिंगसाठी वेगळं आणि जेवणासाठी वेगळं. जर तुम्ही तुमच्या खर्चानुसार कार्ड घेतलं तर तुम्हाला अधिक फायदा मिळू शकेल.