फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन कशी देतात बंपर डिस्काउटं? बाजारभावापेक्षा स्वस्त का मिळतात वस्तू, जाणून घ्या ऑफर्सचा खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 17:02 IST
1 / 5ई-कॉमर्स साइट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट उपलब्ध असल्याने बहुतांश लोक बाजाराऐवजी ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.2 / 5या प्रकाराला कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. संघटनेने वस्तूंवर डिस्काउंट देण्यामागचं सत्यही सांगितलंय.3 / 5फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर कंपन्या थेट कंपनीकडून माल उचलत असल्याने त्यांना स्वस्त मिळत असल्याचं बोललं जातं. मात्र, व्यापारी संघटनांनी हा दावा फेटाळून लावला. ई-कॉमर्स कंपन्या अवास्तव किंमती ठरवत असून उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यासाठी पैसा खर्च करत आहेत. या प्रकारामुळे मोबाईल फोनचे ग्रे मार्केट (अनधिकृत मार्केट) तयार असल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केला.4 / 5काही ब्रँड आणि बँका मोठ्या सवलती देण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांशी संगनमत करत असल्याचा आरोप एआयएमआरएचे संस्थापक आणि अध्यक्ष कैलाश लाखयानी यांनी केला. 5 / 5AIMRA ने ई-कॉमर्स कंपन्यांशी संगनमत केल्याच्या आरोपाखाली चिनी मोबाईल फोन उत्पादक OnePlus, IQOO आणि Poco यांचे ऑपरेशन्स निलंबित करण्याची मागणी केली आहे.