जगातील १० देशांमध्ये भरावा लागतो सर्वाधिक कर; या देशात सरकार अर्धे उत्पन्न ठेवते स्वतःकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 20:24 IST
1 / 10फिनलँड - या देशाचा आयकर ५७.३ टक्के इतका आहे. या देशात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर घेतले जातात आणि त्या बदल्यात लोकांना नागरिकांना उत्तम राहणीमान दिलं जातं. यामुळे नागरिकांना सार्वधिक फायदा होतो व त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. 2 / 10जपान - फिनलंडनंतर जपानचा क्रमांक लागतो. जपानमधील सर्वोच्च आयकर दर ५५.९५ टक्के आहे. येथे प्रगतीशील कर प्रणाली लागू केली आहे, ज्यामध्ये जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना जास्त कर भरावा लागतो.3 / 10डेन्मार्क - जगात सर्वाधिक आयकर गोळा करणाऱ्या देशांमध्ये डेन्मार्कचा तिसरा क्रमांक लागतो. डेन्मार्कमध्ये सर्वाधिक आयकर दर ५५.९ टक्के आहे. डेन्मार्कमध्ये देखील सार्वधिक कमाई असणाऱ्या उच्चभ्रू नागरिकांवर मोठ्या टक्केवारीवर कर आकारला जातो.4 / 10ऑस्ट्रिया - ऑस्ट्रिया देखील आपल्या नागरिकांकडून खूप जास्त आयकर वसूल करतो. इथं वैयक्तिक आयकर दर ५५ टक्क्यांपर्यंत आहे. या कराच्या माध्यमातून आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांसारख्या सार्वजनिक सेवांसाठी निधी उभारला जातो. या सर्व सेवा सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.5 / 10स्वीडन - स्वीडनमध्ये वैयक्तिक आयकर कर ५२.३ टक्के आहे. नागरिकांना उच्च शिक्षण, दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधांचा वापर करता यावा यासाठी इथं मोठ्या प्रमाणात कर आकारले जातात. या करांच्या माध्यमातून स्वीडन हा देश स्थानिकांना प्रगत प्रणाली पुरवण्याचे काम करते. 6 / 10अरुबा - अरुबा हा दक्षिण कॅरिबियन समुद्रात वसलेला एक छोटासा देश आहे. हा बेट देश त्याच्या सौंदर्य आणि सुरक्षित पर्यटन स्थळांसाठी ओळखला जातो. या देशात ५२ टक्के इतका वैयक्तिक आयकर कर आकारला जातो. 7 / 10बेल्जियम - बेल्जियम हा देश वैयक्तिक आयकर दर आकारण्यात सातव्या क्रमांकावर असून या देशाचा आयकर ५० टक्के इतका आहे. ही कर प्रणाली व्यापक समाजकल्याण कार्यक्रमांना समर्थन देते.8 / 10इस्राईल - इस्त्राईल देखील अशा देशांपैकी एक आहे जे त्यांच्या नागरिकांकडून खूप जास्त आयकर वसूल करतात. इस्रायलचा सर्वोच्च आयकर दर ५० टक्के आहे. इस्राईल हा देश फक्त नऊ लाख नागरिकांची लोकसंख्या असलेला देश आहे.9 / 10स्लोव्हेनिया - स्लोव्हेनिया या देशाचा वैयक्तिक आयकर कर सुमारे ५० टक्के आहे. या देशाची लोकसंख्या २.१ लाख असून हा देश सर्वात लहान युरोपियन देशांपैकी एक आहे. तरीही तेथील नागरिकांवर ५० टक्के कर आकारला जातो. 10 / 10स्लोव्हेनिया - स्लोव्हेनिया या देशाचा वैयक्तिक आयकर कर सुमारे ५० टक्के आहे. या देशाची लोकसंख्या २.१ लाख असून हा देश सर्वात लहान युरोपियन देशांपैकी एक आहे. तरीही तेथील नागरिकांवर ५० टक्के कर आकारला जातो.