शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील या 3 बँकांनी रोवला सातासमुद्रापार झेंडा! जगातील सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 10:30 IST

1 / 6
भारत अनेक बाबतीत जगाशी स्पर्धा करताना पाहायला मिळतो. अगदी जमिनीपासून अंतराळ संशोधनापर्यंत भारताच्या अनेक संस्था जगभर प्रसिद्ध आहेत. यात आता ३ भारतीय बँकांनी भर टाकली आहे.
2 / 6
देशातील HDFC बँक, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी जगातील सर्वाधिक मार्केट कॅप असलेल्या टॉप २५ बँकांमध्ये स्थान मिळवले आहे.
3 / 6
डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि रिसर्च कंपनी ग्लोबल डेटाच्या अहवालात म्हटले आहे की, जगातील टॉप २५ मार्केट कॅप बँकांमध्ये HDFC बँक १३व्या, ICICI बँक १९व्या आणि SBI २४व्या क्रमांकावर आहे. २०२४ च्या चौथ्या तिमाहीच्या (ऑक्टोबर-डिसेंबर) अखेरीस, HDFC बँकेचे मार्केट कॅप १५८.५ अब्ज डॉलर, ICICI बँक १०५.७ अब्ज डॉलर, SBI ८२.९ अब्ज डॉलर होते.
4 / 6
अहवालात भारतीय बँकांची स्थिती मजबूत असल्याचे सांगण्यात आले. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत, ICICI बँकेचे मार्केट कॅप वार्षिक आधारावर २५.८ टक्क्यांनी वाढून १०५.७ अब्ज डॉलर झाले आहे. या कालावधीत, HDFC बँकेचे मार्केट कॅप वार्षिक आधारावर १.६ टक्क्यांनी वाढून १५८.५ अब्ज डॉलर झाले आहे.
5 / 6
अहवालानुसार, डिसेंबर २०२४ च्या अखेरीस जगातील टॉप २५ बँकांचे मार्केट कॅप (बाजार भांडवल) वार्षिक २७.१ टक्क्यांनी वाढून ४.६ ट्रिलियन डॉलरवर जाण्याची अपेक्षा आहे. जेपी मॉर्गन चेस ही मार्केट कॅपनुसार जगातील सर्वात मोठी बँक आहे. २०२४ च्या चौथ्या तिमाहीच्या अखेरीस, त्याचे मार्केट कॅप वार्षिक आधारावर ३७.२ टक्क्यांनी वाढून ६७४.९ अब्ज डॉलर झाले आहे.
6 / 6
या कालावधीत, गोल्डमन सॅक्सच्या मार्केट कॅपमध्ये ४२.९ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केल्यामुळे चौथ्या तिमाहीत बहुतेक समभाग वाढले, तर इतर प्रादेशिक बाजार टॅरिफच्या चिंतेमुळे दबावाखाली राहिले. अहवालात असा अंदाज आहे की डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत लादलेले शुल्क आणि २०२५ मध्ये नियोजित कर कपात एकमेकांना संतुलित करू शकतात.
टॅग्स :hdfc bankएचडीएफसीICICI Bankआयसीआयसीआय बँकState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया