शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 09:51 IST

1 / 10
जीएसटी परिषदेच्या ऐतिहासिक निर्णयामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटवरचा भार हलका होणार आहे. महिलांचे सौंदर्यप्रसाधन, पुरुषांचे कपडे-बूट, मुलांचे खाऊ, किराणा, मनोरंजन, हॉटेलिंग, इलेक्ट्रॉनिक्सपासून कारपर्यंत सर्वच वस्तूंवर कर कपात झाली आहे. त्यामुळे “बचतीचा नवा उत्सव” सुरू होईल, असा अंदाज आहे.
2 / 10
कुटुंबाचा दैनंदिन खर्च कमी होणार का? - जीएसटीतील बदलांमुळे कुटुंबांचा मासिक खर्च कमी होईल, तर व्यवसायांसाठी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. 'रोजच्या वापरातील वस्तूंचे दर कमी झाल्यामुळे सामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळेल,' भारतीय उद्योग संघटनेचे महासंचालक म्हणाले आहेत.
3 / 10
माझ्या खिशाला नवे दर परवडतील का? - पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष हेमंत जैन म्हणाले की, या बदलामुळे ग्राहकांचे कल्याण साधले जाईल. 'सौंदर्यप्रसाधने, पॅकेज्ड फूड आणि भांडी यांसारख्या आवश्यक वस्तूंवरील कर १८-१२% वरून थेट ५% केल्यामुळे लोकांचा खर्च कमी होईल आणि बाजारातील मागणी वाढेल,' असे ते म्हणाले.
4 / 10
वस्त्रोद्योगाचे काय होईल? - टेक्सटाईल उद्योगासाठी तर हा निर्णय वरदान ठरला आहे. कृत्रिम धागे आणि यार्नवरील कर १८% आणि १२% वरून ५% केल्यामुळे हजारो विणकर आणि व्यावसायिकांचा अडकलेला पैसा आता मोकळा होईल. यामुळे उद्योग अधिक स्पर्धात्मक बनतील.
5 / 10
पर्यटन वाढेल की नाही? - हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेनेदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. ७,५०० रुपयांपर्यंतच्या हॉटेल रूमवरील कर ५% केल्यामुळे देशातील हॉटेल्स परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील. त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करता येईल, आणि पर्यटन उद्योगाला बळ मिळेल.
6 / 10
शालेय स्टेशनरी अंदाजे खर्च रू.८०० (बचत रू. ९६), हॉटेलिंग खर्च रू. १,००० (बचत रू.१३०), मनोरंजन खर्च रू. १,००० (बचत रू. १३०) औषधे खर्च रू. ५०० (बचत रू. ३५), स्वच्छतेची साधने खर्च रू. १,५०० (बचत रू. १९५) किराणा व खाऊ खर्च रू. १०,००० (बचत रू. १,०००), सौंदर्यप्रसाधने खर्च रू. २,००० (बचत रू. २६०), कपडे (महिला+पुरुष) खर्च रू. १,५०० (बचत रू. १०५), बूट/चप्पल रू. १,००० (बचत रू.१३०), मुलांचे खाऊ रू. २,००० (बचत रू. २६०)
7 / 10
वर दिलेली आकडेवारी कुटुंबाचा सरासरी खर्च गृहीत धरून तयार केलेली आहे. प्रत्यक्षात होणारी बचत संबंधित कुटुंबाच्या खरेदीच्या सवयींवर अवलंबून असेल. जीएसटीचे नवे दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याने ही बचत त्यानंतर दिसेल.
8 / 10
जीएसटी परिषदेने ग्राहकांसाठी सणासुदीपूर्वीच मोठा दिलासा दिला आहे. २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी दरांमुळे साबण, गॅझेट्स, टीव्ही, एसी, कारसारख्या वस्तूंवर थेट १०% ते १५% पर्यंत किमती कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या खरेदीसाठी थोडा संयम ठेवा, असा थेट सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
9 / 10
नवीन दर लागू झाल्यानंतर घरगुती सामानांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू, चारचाकी व दुचाकी वाहने अशा कोणत्याही वस्तूंची विक्री विक्रेते जुन्या दराने बिल करू शकत नाहीत. सरकारने जीएसटीतील दर बदलाचा फायदा थेट ग्राहकांना देण्याची अपेक्षा कंपन्यांकडे केली आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरनंतर खरेदी केल्यास ग्राहकांनी आपल्या बिलातच कमी जीएसटी दिसेल.
10 / 10
मोबाईल, मोठ्या स्क्रीनचा टीव्ही, कार, एसी यांसारख्या वस्तूंवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. दरम्यान, दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर सौम्य परिणाम असून, अन्नधान्य, औषधे, स्टेशनरी यांसारख्या वस्तूंवर कर शून्य किंवा ५% पर्यंतच आहे. म्हणूनच सणासुदीच्या ऑफर्ससोबत जीएसटी कपातही मिळणार असल्याने, खरेदीसाठी २२ सप्टेंबरनंतरचा काळ अधिक फायदेशीर ठरेल.
टॅग्स :GSTजीएसटी