शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vodafone Idea चं ग्राहकांना मोठं गिफ्ट; घरबल्याच होणार आता हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 15:32 IST

1 / 8
काही दिवसांपूर्वीच खासगी दूरसंचार कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यानंतर ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. परंतु Vodafone Idea आता आपल्या डोअरस्टेप डिलिव्हरीसह प्रीमियम, फॅन्सी आणि कस्टमाइज्ड मोबाईल नंबर निवडण्याची संधी देत ​​आहे.
2 / 8
Vi ग्राहक त्यांच्या भाग्यवान क्रमांक, जन्मतारीख किंवा त्यांच्या जीवनात विशेष महत्त्व असलेल्या इतर कोणत्याही तारखेच्या आधारे विशिष्ट क्रमांक निवडू शकतात. म्हणजेच, तुम्हाला हव्या त्या क्रमांकाचा प्रकार तुम्ही निवडू शकता.
3 / 8
प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहक या प्रीमियम क्रमांकांचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद, सुरत आणि जयपूर येथे राहत असाल तर सिमकार्ड तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल.
4 / 8
तुम्ही देशाच्या इतर कोणत्याही भागात राहात असाल, तरीही तुम्हाला तुमच्या आवडीचा नंबर मिळू शकेल, पण त्यासाठी तुम्हाला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला तुमच्या पसंतीचा मोबाईल नंबर कसा मिळेल.
5 / 8
यासाठी प्रथम तुम्हाला https://www.myvi.in/new-connection/choose-your-fancy-mobile-numbers-online या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रीपेड किंवा पोस्टपेड हा पर्याय निवडावा लागेल.
6 / 8
त्यानंतर ग्राहकांना पिन कोड आणि मोबाईल क्रमांकासारखी डिटेल टाकावी लागेल. यानंतर एक VIP क्रमांक निवडावा. तसंच लिस्टमध्ये तुमच्या पसंतीचा नंबर नसेल तर तुम्ही जन्मदिवस, अॅनिव्हर्सरीशी निगडीत आकडे टाका. त्यानंतर तुमच्यासमोर एक लिस्ट ओपन होईल
7 / 8
त्यानंतर तुम्हाला ऑर्डर देण्यासाठी तुमचं नाव आणि पत्ता द्यावा लागेल. यानंतर नव्या मोबाइल क्रमांकाचं शुल्क भरा आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय हे सिमकार्य तुमच्या घरी पोहोचेल.
8 / 8
त्यानंतर तुम्हाला ऑर्डर देण्यासाठी तुमचं नाव आणि पत्ता द्यावा लागेल. यानंतर नव्या मोबाइल क्रमांकाचं शुल्क भरा आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय हे सिमकार्य तुमच्या घरी पोहोचेल.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडिया