UPI Lite वापरणाऱ्या युजर्ससाठी मोठी बातमी; आता 'या' खास फीचरचा घेता येणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:23 IST
1 / 6नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI Lite वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे. लवकरच तुम्ही UPI Lite खात्यात ठेवलेली तुमची शिल्लक रक्कम काढू शकाल.2 / 6एनपीसीआयने त्यांच्या सर्व पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर (PSP) बँकांना आणि अॅप्सना याबद्दल सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ज्यावर UPI Lite लाइव्ह आहे, ते ३१ मार्च २०२५ पर्यंत 'ट्रांसफर आउट' हे फीचर सक्रीय करू शकतात. याद्वारे युजर्सना त्यांच्या UPI Lite शिल्लकमधून त्या बँक खात्यात पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल.3 / 6सध्या, UPI Lite वापरकर्त्यांना पैस काढण्याचा पर्याय उपलब्ध नाही. जर एखाद्या व्यक्तीला UPI LITE मधून शिल्लक रक्कम काढायची असेल, तर युजर्सला आपले UPI Lite खाते निष्क्रिय करावे लागते.4 / 6NPCI वेबसाइटवर म्हटल्याप्रमाणे, UPI Lite वरील disable बटणावर क्लिक केल्यावर, UPI LITE खात्यातील बँकेकडे उपलब्ध असलेली शिल्लक ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाते.5 / 6UPI Lite ला जलद ऑफलाईन पेमेंट सुलभ करण्यासाठी डिझाइन केले आहे. आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी स्थिर इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही.6 / 6UPI Lite सामान्यत: लहान-मूल्याच्या व्यवहारांसाठी वापरले जाते, त्याची प्रति व्यवहार मर्यादा ५०० आणि प्रति दिवसाची मर्यादा ४,००० रुपये आहे. लहान पेमेंटसाठी (उदा. 200-500 रुपयांपर्यंत) UPI पिन टाकण्याची आवश्यकता नाही.