By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:30 IST
1 / 9Gold Silver Rate Today : जर तुम्ही आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीचा कल बुधवारीही कायम आहे. 2 / 9Gold Silver Rate Today : फ्युचर्स मार्केटमध्ये आजही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोन्याचा भाव किंचित वाढीसह ५८,४५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यानंतर, त्याच्या किमतीत आणखी घसरण दिसून आली आहे.3 / 9१२ वाजेपर्यंत सोन्याचे दर कालच्या तुलनेत १५७ रुपयांनी कमी होऊन ५८,२७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. मंगळवारी सोन्याचे दर ५८,४३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.4 / 9Gold Silver Rate Today : सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचा भावही आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये कमी झाल्याचा दिसून आला.5 / 9काल चांदी ७१,७७७ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली होती, तर आज ७१,३२३ रुपये प्रति ग्रॅमवर उघडली.6 / 9यानंतर, फ्युचर्स मार्केटमध्ये त्याच्या किमतीत आणखी घसरण दिसून आली आहे आणि कालच्या तुलनेत ती ४५४ रुपयांनी घसरून ७१,३२३ रुपये झाली आहे.7 / 9चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोने ५९,७८० रुपये, चांदी ७७,००० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर मुंबईत- २४ कॅरेट सोने ५९,४५० रुपये, चांदी ७४,२०० रुपये किलो दराने विकली जात आहे.8 / 9दिल्लीत २४ कॅरेट सोने ५९,६०० रुपये, चांदी ७४,२०० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर कोलकाता येथे २४ कॅरेट सोने ५९,४५० रुपये, चांदी ७४,२०० रुपये किलो दराने विकली जात आहे. पुण्यात २४ कॅरेट सोने ५९,४५० रुपये, चांदी ७४,२०० रुपये किलो दराने विकली जात आहे.9 / 9लखनौमध्ये २४ कॅरेट सोने ५९,६०० रुपये, चांदी ७४,२०० रुपये किलो दराने विकली जात आहे. पाटण्यात २४ कॅरेट सोने ५९,५०० रुपये, चांदी ७४,२०० रुपये किलो दराने विकली जात आहे. गुरुग्राममध्ये २४ कॅरेट सोने ५९,६०० रुपये, चांदी ७४,२०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.