Gold Silver Rate: ऐन लग्नसराईत सोनं-चांदी पुन्हा महागलं! जाणून घ्या आजचे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:01 IST
1 / 7सोनं-चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. सोन्या-चांदीच्या दरात आज पु्न्हा तेजी आली आहे. सोनं ५४,००० रुपये प्रति १० ग्रॅम पार गेले अजुनही दरवाढ होण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर गगनाला भिडले असून चांदीमध्येही मोठी दरवाढ झाली आहे. 2 / 7मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. त्याच्या किमतीत 350 रुपयांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे.3 / 7MCX वर सोने फेब्रुवारी फ्युचर्स 362 रुपये किंवा 0.67 टक्क्यांनी वाढून 54212 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले आहेत.4 / 7मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्याही किंमती वाढल्या आहेत.5 / 7850-900 रुपये प्रति किलो मध्ये वाढ झाली आहे. सध्या चांदीचे दर 67,300 रुपये प्रति किलो वर गेले आहेत. मागणी वाढल्याने दरवाढ झाल्याचे बोलले जात आहे.6 / 7आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढत आहेत आणि कोमॅक्सवर सोने 11.15 डॉलर 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 1,820.75 डॉलर प्रति औंसवर आहे. कोमॅक्सवर चांदी 0.235 डॉलर वर आहे.7 / 7सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो.