१० ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा गगनाला; २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याची नवी किंमत काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:06 IST
1 / 5तुम्ही जर सोने-चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमची धडधड वाढवू शकते. शेअर बाजारातील वाढीसोबतच बुधवारी (५ मार्च २०२५) सोन्याच्या किमतीतही वाढ दिसून आली. 2 / 5आज भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत ८८,१३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८०,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ६६,११० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. 3 / 5आज भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ८७,५६३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नई सारख्या इतर मेट्रो शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ८७,४१५ रुपये प्रति १० ग्रॅम, ८७,४१५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि ८७,४११ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.4 / 5बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, MCX वर चांदीचा बेंचमार्क आज 38 रुपयांच्या वाढीसह ९६,०९३ रुपयांवर उघडला. भारतीय शहरांमधील चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज दिल्लीमध्ये चांदीची प्रति १० ग्रॅम किंमत ९६४.३ रुपये आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत ९६८.८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.5 / 5मुंबईबद्दल बोलायचे झाले तर ते ९८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर पाटण्यात ते ९६५.५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर लखनऊमध्ये चांदीची किंमत ९६६.२ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.