Gold Silver Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दरांना लागला ब्रेक, तपासा आजचे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 14:48 IST
1 / 11सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते, दरम्यान आता या दर वाढीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे.2 / 11दरम्यान आज शुक्रवारी बाजारात सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही.चांदीचा भावही स्थिर राहिला. कर आणि उत्पादन शुल्कामुळे सोन्या-चांदीची किंमत दररोज वाढत आणि कमी होत आहे.3 / 11१५ सप्टेंबरला २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४६५० रुपये होता. १४ सप्टेंबरलाही सोन्याचा भाव हाच होता. याआधी १३ सप्टेंबरला सोन्याचे भाव ५४९९० रुपये होती, तर १२ सप्टेंबरलाही सोन्याचा भाव हाच होता. 4 / 11यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी त्याची किंमत ५५००० रुपये होती. तर १० सप्टेंबर रोजी त्याची किंमत ५५१५० रुपये होती. ९ सप्टेंबरलाही तोच भाव होता.5 / 11२२ कॅरेट व्यतिरिक्त, जर आपण २४ कॅरेट १० ग्रॅम शुद्ध सोन्याबद्दल बोललो तर शुक्रवारी त्याची किंमत ५९०८० रुपये होती. यापूर्वी १४ सप्टेंबरलाही हीच किंमत होती. 6 / 11एका व्यापाऱ्याने दिलेली माहिती अशी, वाराणसीत सोन्या-चांदीचे भाव आधी वाढले, नंतर पडले आणि आता ते स्थिरावले आहेत. भविष्यात त्याच्या किमतीत काही चढ-उतार होण्याची शक्यता आहे.7 / 11सोन्याव्यतिरिक्त, चांदीच्या किंमतीतही बदल झालेला नाही, बाजारात चांदीची किंमत ७७००० रुपये प्रति किलो होती. १४ सप्टेंबरला त्याची किंमत तीच होती, तर १३ सप्टेंबरला त्याची किंमत ७७५०० रुपये होती. त्यापूर्वी १२ सप्टेंबरलाही त्याची किंमत हीच होती.8 / 11११ सप्टेंबरला त्याची किंमत ७७००० रुपये प्रति किलो होती. तर १० सप्टेंबरला त्याची किंमत ७७५०० रुपये होती. ८ आणि ९ सप्टेंबरलाही त्याची किंमत समान होती.9 / 11आता सरकारकडूनही स्वस्तात सोनं विकलं जातं आहे. सरकारने सॉवेरन बॉन्ड स्कीम आणली आहे.10 / 11सॉवेरन गोल्ड बॉन्ड स्कीम २०२३-२४(Sovereign Gold Bond Scheme) ची दुसरी सीरीज आज बंद होणार आहे जी ११ सप्टेंबरला खुली झाली होती. ज्याठिकाणी सरकार बाजार भावापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची ऑफर देत होती. जर तुम्ही या योजनेचा फायदा घेतला नसेल तर आजच तुम्ही गुंतवणूक करू शकता.11 / 11गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न देणारी सॉवेरन गोल्ड बॉन्ड स्कीमचे उद्दिष्ट फिजिकल गोल्डची मागणी कमी करणे आहे. त्यामुळे सरकार कमी दरात सोने विक्री करते. यावेळी सोन्याचे दर ५९२३ रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे.