Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:44 IST
1 / 5Gold Silver Price 21 October: एमसीएक्सपाठोपाठ सराफा बाजारातही आज सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ५५८ रुपयांनी वाढून ७७९६८ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. सराफा बाजारात चांदीचा भाव ४८८४ रुपयांनी वधारून ९७१६७ रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.2 / 5सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.3 / 5आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ५५६ रुपयांनी वाढून ७७,७५६ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १२५ रुपयांनी वाढलाय. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ४१८ रुपयांनी वधारला असून तो ५८,४७६ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३२६ रुपयांनी वाढून ४५,६११ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.4 / 5इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा म्हणजेच दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालयं आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहेत.5 / 5या वर्षी सोनं प्रति १० ग्रॅम १४,६१६ रुपयांनी महागलं आहे. आयबीजेएनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ६३,३५२ रुपये होती. मात्र, या कालावधीत चांदी ७३३९५ रुपयांवरून ९७१६७ रुपये प्रति किलो झाली आहे. चांदीनं आज उच्चांक गाठला आहे. या कालावधीत त्यात २३७७२ रुपयांची वाढ झाली आहे.