Gold Silver Price Today: सोन्याची किंमत वाढली, चांदीचे दर कमी झाले, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:22 IST
1 / 9Gold Silver Price Today: सोन्याच्या किंमती कमी होण्याचं नाव घेत नाहीत. अजूनही दरात वाढ सुरुच आहे.2 / 9सराफा बाजारातील ताज्या दरांनुसार, आज होळीपूर्वी, १३ मार्च रोजी, २४ कॅरेट सोन्याचा भाव ८६६७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला, जो बुधवारच्या ८६१४३ रुपयांच्या बंद किमतीपेक्षा ५२९ रुपयांनी वाढला, चांदीचा भाव १५० रुपयांनी घसरून ९७९५० रुपये प्रति किलो झाला.3 / 9इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून सराफा बाजार दर जारी केले आहेत. यामध्ये GST आकारण्यात आलेला नाही. तुमच्या शहरात यामुळे १००० ते २००० रुपयांचा फरक पडण्याची शक्यता आहे. 4 / 9आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरी संध्याकाळी ५ च्या सुमारास जाहीर केले जातात.5 / 9आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोने देखील ५२७ रुपयांनी महागले आणि ८६३२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. दुपारी २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत ४८५ रुपयांनी वाढून ७९३९२ रुपयांवर उघडले.6 / 9१८ कॅरेटच्या किमतीतही ३९७ रुपयांची वाढ झाली आहे आणि ती प्रति १० ग्रॅम ६५००४ रुपयांवर पोहोचली आहे. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ३०९ रुपयांनी वाढून ५०७०३ रुपयांवर पोहोचले आहेत.7 / 9मार्चमध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत १६१६ रुपयांची आणि चांदीच्या किमतीत ४४७० रुपयांची वाढ झाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव ८५०५६ रुपये होता. 8 / 9चांदीची किंमत ९३४८० रुपये आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत सोने १०९३२ रुपयांनी आणि चांदी ११९३३ रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २४ रोजी सोने ७५७४० रुपयांवर बंद झाले. चांदीचा भावही ८६०१७ रुपये प्रति किलोवर बंद झाला.9 / 9दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८८१६३ रुपये आहे. तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७० रुपयांनी वाढून ८०८३३ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. आज दिल्लीत चांदीचा भाव १०३२०० रुपये प्रति किलो आहे. आज जयपूरमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८८१५६ रुपये आहे.