Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज बंपर तेजी; घेण्यापूर्वी चेक करा लेटेस्ट दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 14:27 IST
1 / 6Gold Silver Price 13 Sep: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ११४४ रुपयांची वाढ झाली आहे. एका दिवसात चांदी २६०७ रुपयांनी महागली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,९४५ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. गुरुवारी सोन्याचा भाव ७१,८०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीही ८५,७९५ रुपये प्रति किलोवर पोहोचलीये.2 / 6आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ११३९ रुपयांनी वाढून ७२,६५३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मात्र, २२ कॅरेट सोन्यासाठी ६६,८१८ रुपये प्रति १० ग्रॅम मोजावे लागतील. आज यामध्ये १,०४८ रुपयांची वाढ नोंदवली आहे. तर दुसरीकडे १८ कॅरेट सोन्याचा भाव ८५८ रुपयांनी वाढला असून तो ५४,७०९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ६६९ रुपयांनी वाढून ४२६७३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.3 / 6सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोने-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.4 / 6जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७५,१३३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये २१८८ रुपये जीएसटी म्हणून जोडण्यात आलेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७४,८३२ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार त्यात २१७९ रुपयांची भर पडली आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज जीएसटीसह ते ६८,८२२ रुपयांवर पोहोचलेय. त्यात जीएसटी म्हणून २००४ रुपयांची भर पडली आहे.5 / 6१८ कॅरेट सोन्याचा भाव आता १६४१ रुपयांच्या जीएसटीसह ५६३५० रुपये झाला आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा समाविष्ट नाही.. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८८,३६८ रुपयांवर पोहोचला आहे.6 / 6फेडकडून व्याजदरात कपातीच्या अपेक्षेमुळे सोन्याच्या किंमतींनी आज विक्रमी उच्चांक गाठला. स्पॉट गोल्डनं २,५६२.६६ डॉलर्स प्रति औंसचा उच्चांकी स्तर गाठला, तर अमेरिकन सोन्याचा वायदा १.५ टक्क्यांनी वधारून २,५८०.६० डॉलरवर पोहोचला.