1 / 7सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शु्क्रवारी सकाळी बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत. 2 / 7Gold Silver Price : आयबीजेए'च्या नवीनतम दरानुसार, आज शुक्रवार, ३१ मे रोजी चांदी प्रति किलो ८८० रुपयांनी स्वस्त झाली असून ९१७९३ रुपयांवर उघडली. 3 / 7आज चांदीची किंमत २९ मे रोजी ९४२८० रुपये प्रति किलोच्या सार्वकालिक उच्चांकावरून २४८७ रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर, २१ मे रोजीच्या ७४२२२ रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा १९६८ रुपये कमी दराने सोने मिळत आहे.4 / 7२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२२५४ प्रति १० ग्रॅम आहे, २३ कॅरेट सोन्याची किंमत ७१९६५ प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ६६१८५ प्रति १० ग्रॅम आहे. 5 / 7१८ कॅरेट सोन्याची किंमत ५४१९१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. १४ कॅरेट सोन्याची किंमत ४२२६९ प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा दर ९१७९३ रुपये प्रति किलो आहे. 6 / 7आज २३ कॅरेट सोन्याचा दर GST सह ७४४२१ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. इतर शुल्कांसह याची किंमत सुमारे ८१८६३ रुपये असेल.7 / 7२२ कॅरेट सोन्याचा दरही आज १३९ रुपयांनी वाढून ६६१८५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा जोडल्यानंतर २२ कॅरेटची किंमत ७४९८७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.