शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 09:04 IST

1 / 9
जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि महागाईचा दबाव यामुळे २२ एप्रिल २०२५ सोन्याने पहिल्यांदाच प्रतितोळा १ लाख रुपयांचा टप्पा पार केला. गुंतवणूक प्लॅटफॉर्म ‘वेंच्युरा’नुसार मागील अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत यंदा सोन्याच्या किमतीत ३० % वाढ झाली आहे. त्यावेळी सोने ७३,२४० रुपये प्रतितोळा होते. २०२९ च्या तुलनेत किमतीत सुमारे २०० टक्के वाढ झाली.
2 / 9
मंगळवारी बाजारात जीएसटीसह सोने ९६ हजार ५०० रुपये तोळा, तर चांदी ९८ हजार रुपये किलो असा भाव होता. असे असले तरी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताला सोनेखरेदीचा उत्साह देशात कायम आहे. मात्र सोन्याच्या विक्रमी किमतीमुळे यंदा अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या विक्रीच्या प्रमाणात घट होऊ शकते. मात्र, एकूण महसूल मागील वर्षीइतकाच राहण्याची अपेक्षा आहे.
3 / 9
अक्षय तृतीयेला किती दर? वर्ष रुपये प्रतितोळा २०२५ ९६,५०० २०२४ ७३,२४० २०२३ ५९,८४५ २०२२ ५०,८०८ २०२१ ४७,६७६ २०२० ४६,५२७ २०१९ ३१,७२९ २०१८ ३१,५३४ २०१७ २८,८७३ २०१६ २९,८०५ २०१५ २६,९३६
4 / 9
यंदा अक्षय्य तृतीया २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५:३१ वाजल्यापासून ३० एप्रिल रोजी दुपारी २:१२ वाजेपर्यंत साजरी केली जाईल. हा मुहूर्त सोन्याच्या खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो.
5 / 9
सोन्याच्या वाढत्या किमतीचा प्रभाव ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींवर दिसत आहे. लग्नांसाठी कुटुंबे जड दागिन्यांऐवजी हलक्या दागिन्यांचा पर्याय निवडत आहेत. ते मासिक हप्त्यांच्या योजनांद्वारे सोने खरेदी करण्याचा पर्यायही स्वीकारत आहेत.
6 / 9
नैसर्गिक डायमंड्स, रत्नजडित दागिन्यांमध्येही ग्राहकांची रुची वाढली आहे. ज्वेलर्सही ऑफर्स, ॲडव्हान्स बुकिंग, एक्सचेंज स्कीम्स अशा सुविधा देत आहेत. सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याच्या बिस्किट्स व नाण्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत.
7 / 9
सोन्याने गेली अनेक वर्षे शानदार परतावा दिला असूनही, या वर्षी विक्रमी वाढलेल्या किमतीमुळे सोन्याच्या विक्रीच्या प्रमाणावर दबाव येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञाच्या मो कमी व मध्यम उत्पन्न गटांमध्ये खरेदीच्या प्रमाणात घट दिसून येऊ शकते.
8 / 9
ही मंडळी खरेदीचे प्रमाण कमी करू शकतात किंवा हलक्या दागिन्यांकडे व नाण्यांकडे वळू शकतात. मुंबईतील एका विक्रेत्याने सांगितले की, सोनेविक्रीचे प्रमाण थोडे कमी झाले तरी, वाढलेल्या किमतीमुळे एकूण महसूल मागील वर्षाइतक्याच पातळीवर राहू शकतो.
9 / 9
अनेक ग्राहक यंदा केवळ परंपरा जोपासण्यासाठी प्राधान्य देतील. ते प्रतीकात्मक १ किंवा २ ग्रॅम सोने खरेदी नक्कीच करतील.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी