शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver Price: मस्तच! सोने-चांदीच्या दरात घसरण, दागिन्यांच्या खरेदीसाठी योग्य संधी; जाणून घ्या आजचा दर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 5:54 PM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या दराला आज मात्र ब्रेक लागला आहे. सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर दुपारी साडेपाच वाजता सोन्याच्या दरात २११ रुपयांची घट नोंदविण्यात आलेली आहे.
2 / 10
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या दराला आज मात्र ब्रेक लागला आहे. सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर दुपारी साडेपाच वाजता सोन्याच्या दरात २११ रुपयांची घट नोंदविण्यात आलेली आहे.
3 / 10
बाजार संपताच सोन्याचा दरातील घसरण कायम राहून सोन्याच्या दरात एकूण २११ रुपयांची घसरणीची नोंद झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे.
4 / 10
दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. दुपारी साडेपाच वाजता MCX वर चांदीच्या दरात प्रतिकिलो ४२५ रुपयांची घसरणीची नोंद झाली आहे.
5 / 10
सकाळी बाजार सुरू होताच चांदीच्या दरात ८२ रुपयांची घट नोंदविण्यात आली होती. हीच घसरण कायम राहून दिवसाच्या अखेर चांदीच्या दरात ४२५ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा प्रतिकिलो भाव ६६ हजार ७१२ रुपये इतका आहे.
6 / 10
दरम्यान, सोन्याची सध्याची वाटचाल पाहता आगामी काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 / 10
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत असून सद्या सोन्याचा दर ४७ हजारांच्या खाली आला आहे. पण डिसेंबरपर्यंत सोन्याचा दर पुन्हा ५० हजाराच्या वर जाऊ शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
8 / 10
सोन्याचा सध्याचा दर दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे बाजारावर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे. त्यामुळे डिसेंबर पर्यंत सोन्याचा दर ५२ हजारांची पातळी गाठू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
9 / 10
कोरोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पसंती मिळालेल्या सोन्याच्या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील एप्रिल- मे महिन्यांच्या तुलनेत गेल्यावर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिकपट सोन्याची आयात झाली आहे.
10 / 10
एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये देशात तब्बल ७.९१ कोटी डॉलर्स इतक्या मूल्याच्या सोन्याची आयात झाली. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू खात्यात मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. चालू खात्यातील तुटीचा आकडा २१.३८ अब्ज डॉलर्स इतका आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी