By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:24 IST
1 / 8आज भारतीय सर्राफा बाजारात सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ७३२ रुपयांनी वधारले असून, जीएसटीसह सोन्याचा भाव ₹ १,३७,४४५ पर्यंत पोहोचला आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.2 / 8सोमवारी जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोने ₹ १,३३,४४२ प्रति १० ग्रॅमवर खुले झाले. या वर्षात आतापर्यंत सोन्याने ₹ ५७,७०२ रुपयांची मोठी झेप घेतली आहे.3 / 8चांदीच्या दरात मोठी घसरण: आज चांदीच्या दरात प्रति किलो ₹ २,९५८ रुपयांची मोठी घसरण दिसून आली. जीएसटीशिवाय चांदी ₹ १,९२,२२२ प्रति किलोवर खुली झाली. तर जीएसटीसह हा दर ₹ १,९७,९८८ पर्यंत पोहोचला आहे. 4 / 8शुक्रवारी चांदीचा दर ₹ १,९५,१८० (ऑल टाइम हाय) प्रति किलो होता. सध्या चांदीचा दर तिच्या 'ऑल टाईम हाय'च्या तुलनेत ₹ २,९५८ ने कमी झाला आहे. तसेच, सोन्याचा दर जिएसटीशिवाय 132710 रुपये प्रति 10 ग्रामवर बंद झाला होता.5 / 8कॅरेटनुसार सोन्याचे दर (जीएसटीसह): आज २३ कॅरेट सोन्याचा दर ₹ ७२९ रुपयांची वधारला असून ₹ १,३६,८९५ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹ ६७१ रुपयांची वाढून ₹ १,२५,८९९ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.6 / 8याशिवाय, १८ कॅरेट सोन्याचा दर ₹ ५४९ रुपयांची वाढून ₹ १,०३,०८४ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तसेच, १४ कॅरेट सोने ₹ ८०,४०५ प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. 7 / 8सोन्याच्या किमतीतील या विक्रमी वाढीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता या मौल्यवान धातूकडे लागले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशन (IBJA) दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता, असे दिवसातून दोनवेळा दर जाहीर करते.8 / 8सोन्याच्या किमतीतील या विक्रमी वाढीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता या मौल्यवान धातूकडे लागले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशन (IBJA) दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता, असे दिवसातून दोनवेळा दर जाहीर करते.