By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 11:54 IST
1 / 9नवी दिल्ली: सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचे दर आज भारतीय बाजारात कमी झाले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold price on MCX) सोन्याचे दर आज 46,633 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहेत. 2 / 9तर सप्टेंबरच्या चांदीचा वायदा (Silver price today) दर 0.71 टक्क्यानी वाढून 60,870 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.7 टक्क्यांनी तर चांदीचा दर 1.2 टक्क्यांनी वाढला होते. 3 / 9दरम्यान गेल्यावर्षी सोन्याचा दर 56,000 रुपये प्रति तोळावर पोहोचला होता. त्यानुसार आता सोन्याचा दर जवळपास 10000 रुपयांनी स्वस्त आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते आज बुधवारी सोन्याचा दर (24 कॅरेट) सोन्याचा दर 46,330 रुपये प्रति तोळावर आहे. 4 / 9मंगळवारच्या दराच्या तुलनेत आज चांदीचा दर 200 रुपयांनी कमी झाला आहे. यामुळे चांदी आज 59,800 रुपये प्रति किलोग्राम या दराने विकली जात आहे. नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 45,650 रुपये आणि 45,330 रुपये प्रति तोळा आहे.5 / 9वेबसाइटच्या मते, चेन्नईमध्ये सोन्याचे दर 43,740 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 49,800 रुपये प्रति तोळा आणि मुंबईमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,330 रुपये प्रति तोळा आहे.6 / 9तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. 7 / 9काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.8 / 9जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. 9 / 9या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.