राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा काय आहेत आजचे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:39 IST
1 / 5Gold Silver Price Today 25 August 2022: सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या स्पॉट किमतीत मोठा बदल झाला आहे. आज 24 कॅरेट सोने 51958 रुपयांवर उघडले, जे बुधवारच्या बंद दरापेक्षा 328 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 561 रुपयांनी वाढून 55785 रुपये प्रति किलोवर पोहोचला. 2 / 5आता शुद्ध सोने आपल्या ऑल टाईम हाय रेट 56254 रुपये प्रति 10 ग्रॅम दरापेक्षा 4296 रुपयांनी स्वस्त आहे. तर, दोन वर्षांपूर्वीच्या 76008 रुपये प्रति किलोच्या उच्चांकी दरावरून चांदी 20223 रुपयांनी स्वस्त आहे.3 / 5याशिवाय 23 कॅरेट सोन्याचा भाव आता 51750 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट 47594, 18 कॅरेट 38969 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव आता 30395 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्यात जीएसटी आणि ज्वेलर्सचा नफा समाविष्ट नाही.4 / 524 कॅरेट सोन्यावर 3 टक्के जीएसटी म्हणजेच 1558 रुपये जोडल्यास त्याचा दर 53516 रुपये होईल. दुसरीकडे, ज्वेलर्सचा 10 टक्के नफा म्हणजेच 5351 रुपये जोडल्यानंतर सोन्याची किंमत 58868 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटी जोडल्यानंतर चांदीची किंमत 57458 रुपये प्रति किलो झाली आहे. यामध्ये ज्वेलर्सचा 10 ते 15 टक्के नफा वेगळा आहे. म्हणजेच, 10 टक्के नफा जोडल्यास चांदीचा दर सुमारे 63204 रुपये झाला आहे.5 / 524 कॅरेट सोने 22 किंवा 18 कॅरेट सोन्यापेक्षा जास्त महाग असते. याशिवाय 24 कॅरेट सोन्याचा वापर नाणी आणि बार बनवण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये केला जातो.