1 / 7Gold Rate Today In India: देशात सोमवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तुलनेत काल सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १० रुपयांनी घट झाली आहे. ४ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालापूर्वी सराफा बाजारात सोन्यात घसरण पाहायला मिळत आहे. 2 / 7चांदीचा किरकोळ भाव ९३,४०० रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात १०० रुपयांनी घट झाली आहे. जाणून घेऊया देशातील १२ प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव किती आहे.3 / 7३ जून २०२४ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,६४० रुपये प्रति १० ग्रॅम होता. दरम्यान, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७२,६९० रुपये आहे.4 / 7मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,४९० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,५४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.5 / 7अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,५४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,५९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.6 / 7जागतिक बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. कॉमेक्सवरील जागतिक सोन्याचा वायदा भाव ०.१७ टक्क्यांनी घसरून २,३४१.८० डॉलर प्रति औंस झाला. तर सोन्याचा जागतिक स्पॉट भाव २,३२१.४३ डॉलर प्रति औंस वर पोहोचला आहे.7 / 7जागतिक स्तरावर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. कॉमेक्सवर चांदीचा वायदा भाव ०.३० टक्क्यांनी घसरून ३०.३५ डॉलर प्रति औंस झाला. तर चांदीचा जागतिक स्पॉट भाव ३०.२२ डॉलर प्रति औंस वर पोहोचला आहे.