By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 13:37 IST
1 / 8नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात (Gold-silver Price) आज पुन्हा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने (Gold Price) 35 रुपयांनी महाग होऊन आज सकाळपासून 52913.00 रुपयांवर व्यवहार होत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. 2 / 8काल म्हणजेच मंगळवारीही चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली होती. आज चांदीचा भाव (Silver price today) 162.00 रुपयांच्या वाढीसह 68952 रुपयांवर ट्रेड करत आहे. लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात जोरदार वाढ झाली आहे.3 / 8एमसीएक्सशिवाय सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 49702 रुपयांवर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 54220 रुपयांवर आहे. त्याचवेळी, 20 कॅरेट सोन्याचा भाव 45183 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 40665 रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय, 16 कॅरेट सोन्याचा दर 36147 रुपयांवर पोहोचला आहे.4 / 8काही दिवसांतच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळातही देशातील लोकांचे सोन्याकडे असलेले आकर्षण कमी होत नाही. 2021-22 च्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशातील सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलर झाली आहे. मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत सोने आयातीचा आकडा 26.11 अब्ज डॉलर होता.5 / 8तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. 6 / 8काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.7 / 8जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. 8 / 8या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.