म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:08 IST
1 / 6काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी सिंधू पाणी करार आणि अटारी वाघा सीमा व्यापारी मार्ग बंद केला आहे. पण, पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली आहे. यासाठी एकच उदाहरण पुरेस आहे, ते म्हणजे सोन्याची किंमत.2 / 6भारतात सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या पुढे गेला तेव्हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. पण, पाकिस्तानमध्ये सोन्याचे भाव भारतापेक्षाही वेगाने वाढले आहेत. आपल्या देशात अजूनही आपण सोने घेण्याचा विचार करू. पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत ऐकूनच लोक दूर पळत आहेत.3 / 6पाकिस्तानमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३ लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. म्हणजे एका तोळ्यासाठी ३ लाख रुपये मोजावे लागतील.4 / 6आजच्या दिवशी २५ एप्रिल रोजी १० ग्रॅम पाकिस्तानी सोन्याची किंमत ३,१९,९९० रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्यावर घडणावर आणि इतर कर लागून किंमत नक्कीच ४ लाखांच्या जवळपास पोहोचेल.5 / 6भारताबद्दल बोलायचे झाले तर, या आठवड्यात सोन्याने १ लाखांचा टप्पा ओलांडून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. सध्या, बातमी लिहिण्याच्या वेळी, भारतात २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८२४० रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे.6 / 6भारताबद्दल बोलायचे झाले तर, सोन्याच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीपेक्षा सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.