1 / 8सोनं आणि चांदी खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. आज दोन्ही धातूंच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. पण आज किंचितशी घट नोंदविण्यात आली आहे. 2 / 8सोन्याच्या दरात आज ११६ रुपयांची तर चांदीच्या दरात आज १२९१ रुपयांची अशाप्रकारे दोन्ही धातूंची मिळून एकूण १३०० रुपयांची घट आज नोंदविण्यात आली आहे. 3 / 8दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा दर ४८ हजार ७७२ रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो ७० हजार ८३६ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. 4 / 8मंगळवारी हाच दर सोन्यासाठी ४८ हजार ८८८ रुपये इतका होता. तर चांदीसाठी प्रतिकिलो ७२ हजार १२३ रुपए इतका होता. 5 / 8आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. इन्वेस्टिंग डॉट कॉमच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार दुपारी ३ वाजून २१ मिनिटांनी सोनं ६.२० डॉलरच्या तुटीसह १,८९८.८० डॉलर प्रतिऔंसवर ट्रेंड करत होता. तर याचवेळी चांदीचा दर ०.२१५ डॉलरच्या तुटीसह २७.८८७ डॉलर प्रतिऔंसवर ट्रेंड करत होता. 6 / 8दुसरीकडे MCX वरही सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याचं पाहायला मिळालं. MCX वर दुपारी ३ वाजता सोन्याच्या दरात घट होऊन ४९ हजार ४२४ रुपयांवर ट्रेंड करत होता. तर ऑक्टोबरसाठीच्या दरात १२१ रुपयांची तेजी पाहायला मिळत होती. 7 / 8MCX वर चांदीच्या दरातही घट झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीसाठी जुलैच्या दरात २९३ रुपयांच्या घसरणीसह प्रतिकिलो ७१ हजार ९५५ रुपयांवर ट्रेंड करत होतं. 8 / 8त्याचपद्धतीनं सप्टेंबरसाठीच्या चांदीच्या दरात ५०५ रुपयांची घट दाखवत प्रतिकिलो ७२ हजार ९०८ रुपये ट्रेंड सुरू होता.