By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:41 IST
1 / 8फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा किरकोळ महागाई दर केवळ २.७५% इतका आहे, तर अन्नधान्याची महागाई २.१३% नोंदवण्यात आली आहे.2 / 8जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती सातत्याने वाढतात, तेव्हा त्याला महागाई म्हणतात. यामुळे लोकांच्या पैशांची खरेदी करण्याची शक्ती कालांतराने कमी होत जाते.3 / 8जगातील सर्वाधिक महागाईचा देश: दक्षिण अमेरिकेतील व्हेनेजुएला हा देश सध्या जगातील सर्वात महागडा देश ठरला आहे. २०२५ मध्ये या देशाचा महागाई दर तब्बल २६९.९% इतका नोंदवला गेला आहे.4 / 8राजकीय अस्थिरता, चलनी नोटांची अमर्याद छपाई आणि अमेरिकेने लादलेले निर्बंध यामुळे व्हेनेजुएलाचे चलन 'बोलिव्हर'चे मूल्य कमालीचे घसरले असून तिथे महागाईचा भडका उडाला आहे.5 / 8महागाईच्या यादीत दक्षिण सुदान (९७.५%), झिम्बाब्वे (८९%) आणि सुदान (८७.२%) हे देश व्हेनेजुएलानंतर अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.6 / 8आशिया खंडात इराण (४२.४%), तुर्किये (३४.९%) आणि आपला शेजारी देश म्यानमार (३१%) या देशांमध्येही महागाईने जनता होरपळून निघत आहे.7 / 8कमी विकसित देशांमध्ये मध्यवर्ती बँकिंग यंत्रणा मजबूत नसते. अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी चलनात फेरफार केल्यामुळे तिथे महागाई नियंत्रणाबाहेर जाते.8 / 8ज्या देशात महागाई जास्त असते, तिथे व्याजाचे दरही खूप जास्त असतात. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये महागाईचे प्रमाण कमी आणि स्थिर असते, ज्यामुळे तिथल्या सामान्य जनतेवर आर्थिक ताण कमी पडतो.