शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

केवळ अदानीच नाही तर, वेदांताच्या अनिल अग्रवालांवर आहे इतक्या हजारो कोटींचं कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 18:31 IST

1 / 10
2023 ची सुरुवात भारतीय उद्योगपतींसाठी फारशी चांगली झालेली नाही. भारतातील मोठे उद्योगपती सध्या वाईट काळातून जात आहेत. काही उद्योजकांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. बाजारातील घसरणीचा परिणाम त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे.
2 / 10
हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूह सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. कंपनीचे मार्केट कॅप केवळ 7 लाख कोटींवर आले आहे. कंपनीचे एकूण बाजारमूल्य 63 टक्क्यांनी घसरले आहे. 24 जानेवारी रोजी अदानी समूहाचे बाजारमूल्य 19.19 लाख कोटी होते, ते आता जवळपास 7 लाख कोटींवर आले आहे.
3 / 10
भारतीय व्यवसायित सध्या वाईट टप्प्यांतून जात आहे. प्रामुख्यानं ते ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. अदानी समूहाच्या 236 अब्ज डॉलर्सच्या एम्पायरला एका महिन्यात 63 टक्क्यांचा झटका लागला आहे. परंतु ज्यांना नुकसान सोसावं लागलंय त्यात केवळ अदानीच नाहीत.
4 / 10
अदानी यांच्याशिवाय वेदांताचे अनिल अग्रवालदेखील कठीण काळातून जात आहेत. भारताचे मायनिंग किंग म्हटले जाणारे अनिल अग्रवाल यांची लंडनमध्ये लिस्टेड असलेली कंपनी वेदांता रिसोर्सेस मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे.
5 / 10
जानेवारी 2024 पर्यंत कंपनी त्यांच्यावरील कर्ज कमी करण्याच्या विचारात होती. जानेवारीमझ्ये त्यांना 100 कोटी डॉलर्सचं कर्ज फेडायचं होतं. परंतु कर्ज कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या पार्टनरला नाखूश केलं, ज्यांना त्यांना नाखूश करायचं नव्हतं.
6 / 10
गेल्या वर्षी जेव्हा अमेरिकेची केंद्रिय बँक फेडरल रिझर्व्हनं व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली, तेव्हाच युक्रेन युद्ध सुरू झालं. त्यानंतर कमोडिटीचे भाव गगनाला भिडू लागले होते. याच दरम्यान अनिल अग्रवाल वेदांता रिसोर्सेस आणि वेदांता लिमिटेडवरील कर्ज करण्याचे प्रयत्न करत होते. यात त्यांना थोडं यशही मिळालं. त्यांनी वेदांता रिसोर्सेसवरील कर्ज गेल्या वर्षी कमी करून 10 अब्ज डॉलर्सवरून 8 अब्ज डॉलर्स केले.
7 / 10
वेदांताचे अनिल अग्रवाल यांना 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर करण्यात आले. या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी बाँडच्या रिपेमेंटची बोलणी सुरु केली. आता या वर्षी आणि जानेवारी 2024 मध्ये त्यांच्यासमोर आव्हाने दिसत आहेत. वेदांता रिसोर्सेसचे ऑगस्ट 2024 चे बाँड रेट 70 सेंट्सच्या खाली व्यवहार करत आहेत.
8 / 10
निधी उभारणीच्या दृष्टीने पुढील काही आठवडे वेदांतासाठी आव्हानात्मक असू शकतात. जर वेदांत निधी उभारण्यात अक्षम असेल तर त्याचे क्रेडिट रेटिंग खराब होऊ शकते. स्टँडर्ड अँड पुअर्सने याबाबत सांगितले की, जर फंड रेंजची पूर्तता झाली नाही तर वेदांतावर दबाव येऊ शकतो.
9 / 10
अनिल अग्रवाल यांच्या वेदांतावर गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या तुलनेत तीन पट कमी कर्जाचे ओझे आहे. अदानींवरील कर्जाचा बोजा 24 अब्ज डॉलर्स आहे. भलेही वेदांतावरील कर्जाचं ओझं अदानींच्या तुलनेत कमी आहे, तरी त्यांचे बाँड देखील इन्व्हेस्टमेंट ग्रेडच्या हिशोबानं कमी आहे, हा कंपनीसाठी चिंतेचा विषय आहे.
10 / 10
कंपनीवर वाढत असलेल्या दबावाचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. सोमवारी कंपन्याच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली होती. फोर्ब्सच्या बिलेनियर लिस्टनुसार सोमवारी अनिल अग्रवाल यांच्या नेटवर्थमध्ये 139 मिलियन डॉलर्सची घसरण दिसून आली आहे. त्याचे नेटवर्थ 2 अब्ज डॉलर्स राहिले आहे.
टॅग्स :AdaniअदानीGautam Adaniगौतम अदानी