1 / 8अदानी समूह (Adani group) आणि वॉलमार्ट इंकचे फ्लिपकार्ट (Flipkart) युनिट वेअरहाउसिंग व डेटा सेंटर्सच्या पलीकडे नवीन डोमेनमध्ये त्यांची भागीदारी वाढवण्यासाठी चर्चा करत आहेत. यामध्ये घाऊक ई-कॉमर्स आणि किराणा माल, तसंच घरगुती वस्तूंच्या सोर्सिंगचा समावेश आहे. 2 / 8अदानी वॉलमार्टसोबत धोरणात्मक भागीदारीसाठी नवीन करार करू शकते, ज्याअंतर्गत फ्लिपकार्ट उत्पादनांची विक्री केली जाऊ शकते. यातून मिळणारा महसूल दोन कंपन्यांमध्ये शेअर केला जाऊ शकतो. यासाठी शेअरिंग करार केला जाईल. कराराअंतर्गत, अदानी आणि वॉलमार्ट या दोघांना प्रमाणानुसार उत्पन्न मिळेल. लाईव्ह मिंटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.3 / 8सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागीदारी अंतर्गत, जिथे एकीकडे फ्लिपकार्टकडे उत्पादनांची विस्तृत श्रेणी तयार असेल, जी किरकोळ विक्रेत्यांना विकण्यास सक्षम असेल. दुसरीकडे, कंपनी नवीन घाऊक ग्राहकांना आकर्षित करेल जे पॅकेज केलेल्या वस्तू आणि ग्राहक टिकाऊ वस्तूंच्या व्यवसायांमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांशी संबंधित आहेत. 4 / 8प्रस्तावित करारानुसार अदानी आणि फ्लिपकार्ट हे दोन्ही संयुक्तपणे स्टोअर्स आणि व्यवसाय मालकांना वस्तूंची विक्री घाऊक पद्धतीने व्यवस्थापित करतील. ही भागीदारी ई-कॉमर्स क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्याच्या अदानीच्या धोरणाचा एक भाग असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.5 / 8वॉलमार्ट भारतात फ्लिपकार्ट समुहाच्या बिझनेस टू बिझनेस आर्म फ्लिपकार्ट होलसेलद्वारे आपला ऑनलाइन होलसेल व्यवसाय करते. फ्लिपकार्ट होलसेलचा महसूल 25 टक्क्यांनी वाढून 42,941 कोटी रूपये ढाला आणि तोट 22 टक्क्यांनी कमी होऊन 42445 कोटी इतका राहिला. 6 / 8लिपकार्टचा घाऊक व्यवसाय संपूर्ण भारतातील 1.5 दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचतो. ज्यात किराणा, हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफेटेरिया, कार्यालये आणि संस्थांचा समावेश आहे. खर्च कमी करण्यासाठी आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी आपल्या व्यवसाय ऑपरेशनची पुनर्रचना करणार असल्याची घोषणा यापूर्वी १८ जानेवारी रोजी फ्लिपकार्टने केली होती.7 / 8सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागीदारीचा एक भाग म्हणून, अदानी समूह FMCG उत्पादनांसाठी नवीन मोठ्या स्टोरेज आणि वितरण सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. यात फ्लिपकार्टला अद्याप मार्केट शेअर मिळू शकलेला नाही. यामुळे फ्लिपकार्टला घाऊक सेगमेंटमध्ये मोठ्या संख्येने नवीन ग्राहक मिळवण्यास मदत होऊ शकते.8 / 8दुसरीकडे, यातून अदानींना सक्रिय ई-कॉमर्स व्यवसाय मिळेल आणि नवीन भागीदारी योजनेनुसार फ्लिपकार्टवरील घाऊक व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईचा फायदा होईल. जर ही भागीदारी झाली तर फ्लिपकार्ट आणि अदानी यांची कंपनी मिळून Amazon आणि JioMart सारख्या घाऊक विक्रेत्यांना टक्कर देईल. फ्लिपकार्ट होलसेलची देशात 28 बेस्ट प्राईज स्टोअर्सही आहेत.