शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन रचणार इतिहास! असा विक्रम आतापर्यंत कोणाच्याच नावे नाही; तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:15 IST

1 / 6
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन २ दिवसांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी इतिहास रचणार आहेत. जो स्वतंत्र भारतात कोणीही करू शकले नाही. अर्थमंत्री १ फेब्रुवारीला सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
2 / 6
या घटनेनंतर अर्थमंत्री सीतारामन माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी वेगवेगळ्या काळात सादर केलेल्या १० बजेटच्या विक्रमाच्या जवळ जातील. देसाई यांनी अर्थमंत्री म्हणून १९५९-१९६४ दरम्यान ६ आणि १९६७-१९६९ दरम्यान ४ अर्थसंकल्प सादर केले.
3 / 6
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठवा अर्थसंकल्प सादर करत असल्या तरी यापेक्षा जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मात्र, सितारामन यांनी सलग ८ अर्थसंकल्प सादर केल्याने त्या वेगळ्या ठरतात.
4 / 6
माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनीही वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात अनुक्रमे ९ आणि ८ अर्थसंकल्प सादर केले होते.
5 / 6
२०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांची देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. निर्णायकपणे पंतप्रधान मोदींची ही दुसरी टर्म होती. २०२४ मध्ये मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतरही सीतारामन यांनी त्यांचे अर्थमंत्रालय कायम ठेवले आहे. आतापर्यंत त्यांनी एकूण ७ अर्थसंकल्प सादर केले आहेत, ज्यात फेब्रुवारी २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पाचाही समावेश आहे.
6 / 6
निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी २ तास ४० मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पीय भाषणासह सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम केला. यातही त्यांनी २ पाने शिल्लक असताना भाषण थांबवावे लागले होते.
टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024