ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:40 IST
1 / 10भारतात रोज सुमारे २.५ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र, यांपैकी बहुतांश प्रवाशांना रेल्वेच्या काही महत्त्वाच्या नियमांची माहितीच नसते. काही वेळा तिकीट असूनही ट्रेन चुकते, तेव्हा लोकांना वाटते की, आता त्यांचे तिकीट वेस्ट गेले अथवा निरुपयोगी झाले. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही.2 / 10प्रवासी रेल्वे व्यवस्थेचा योग्य प्रकारे फायदा घेऊन स्वतःचे नुकसान टाळू शकतात. मात्र, बहुतेकांना या नियमाची माहितीच नसते. 3 / 10जर आपल्यासोबतही असे काही घडले, तर लक्षात असू द्या की, आपल्या तिकिटाचा अद्यापही योग्य उपयोग होऊ शकतो. तर जाणून घेऊयात सविस्तर...4 / 10ट्रेन सुटल्याने तिकीट वेस्ट होतं? - जर तुम्ही ट्रेनचे तिकीट घेतले असेल आणि तुमची ट्रेन चुकली, तर नाराज होऊन तिकीट फेकून देण्याची गरज नाही. बरेच लोक ही चूक करतात. कारण असे केल्याने नुकसान होते.5 / 10रेल्वेच्या नियमानुसार, आपले तिकीट अद्यापही कामी येऊ शकते. जर आपण अनरिजर्व अर्थात जनरल तिकीट घेतले असले तर...6 / 10याच तिकिटाने आपण वैधतेच्या कालावधीत इतर कोणत्याही ट्रेनच्या जनरल कोचमध्ये प्रवास करू शकता. यात, कमी अंतराचे तिकीट असेल तर ३ तास आणि लांब अंतराचे तिकिट असेल तर २४ तासांसाठी ही सुविधा मिळू शकते. महत्वाचे म्हणजे, रिझर्व्ह तिकिट असलेल्यांना ही सुविधा मिळत नाही.7 / 10रिझर्व्ह तिकटवाल्यांसाठी टीडीआर पर्याय - जर आपण रिझर्व्हेशन केलेले असेल आणि ट्रेन चुकली, तरीही आपले तिकीट वेस्ट जात नाही. अशा परिस्थितीत आपण टीडीआर अर्थात तिकीट डिपॉझिट रिसिप्ट फाइल करू शकता. 8 / 10टीडीआर फाइल करून आपण रेल्वेकडे आपल्या तिकिटाचे रिफंड मागू शकता. यासाठी आपल्याला ट्रेन सुटल्यानंतर 4 तासांच्या आत ऑनलाइन टीडीआर भरावा लागतो.9 / 10आपण IRCTC ची वेबसाइट अथवा अॅपच्या माध्यमाने ही प्रोसेस करू शकतात. जर आपण योग्य वेळेच्या आत टीडीआर दाखल केला, तर रेल्वे काही पैसे कापून आपले पैसे परत करते. 10 / 10ही सुविधा केवळ रिझर्व्ह तिकिटांसाठीच लागू आहे. तसेच, आपण काउंटरवरून तिकीट घेतले असेल, तर आपल्याला तेथे जाऊनच टीडीआर फाइल करावा लागेल.