शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:30 IST

1 / 7
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. कारण ट्रम्प यांची कामेच अशी आहेत की पार अगदी शेजारी कॅनडापासून ते चीनपर्यंत सर्व देश त्रस्त आहेत. यामुळे अमेरिकेवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीय.
2 / 7
अमेरिकेविरोधात लढण्यासाठी स्वत:ला तयार करा, असे फ्रान्सने राष्ट्राध्यक्षही म्हणाले आहेत. युरोप सोडा अमेरिकेतच ट्रम्प यांच्या धुमधडाक्यामुळे अमेरिकन लोक त्रस्त झाले आहेत. अशातच युरोप अमेरिकेकडे आता आपले सोने परत मागू लागला आहे.
3 / 7
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्व संस्थाच आपल्या ताब्यात ठेवण्यास सुरुवात केली आहे. या त्यांच्या अनियंत्रित कृत्यांमुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या स्वातंत्र्यावरही आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. व्याज दर आणि अन्य नितीसाठी ट्रम्प यांना फेड आपल्या नियंत्रणात हवी आहे.
4 / 7
यामुळे जगात धास्ती निर्माण होऊ लागली आहे. जर ट्रम्प यांनी फेडवर नियंत्रण मिळविले तर आपल्या सोन्याच्या साठ्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होतील अशी भीती युरोपच्या देशांना वाटू लागली आहे. ट्रम्प एखाद्या देशावर नाराज झाले तर त्या देशाला त्याचे सोने परत मिळणे देखील दुरापास्त होणार आहे. यामुळे युरोपीय संघ अमेरिकेत ठेवलेल्या सोन्याच्या साठ्यावर विचार करत आहे. अमेरिकेच्या तिजोरीत हे लाखो टन सोने आहे.
5 / 7
युरोपियन करदाता संघटनेने (TAE) आपल्या देशांनी सोने अमेरिकेतून परत आणावे अशी मागणी केली आहे. जर सोने आणणे शक्य नसेल तर या ठेवलेल्या सोन्याची यादी तयार करून त्याचे ऑडिटतरी करावे असे म्हटले आहे. सोने देशातच आणले पाहिजे असे नाही परंतू ते मिळविताना कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळणे गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
6 / 7
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेकडे ८,१३३.४६ टन सोने आहे, जे जगात सर्वाधिक आहे. त्यानंतर जर्मनी (३,३५१.५३ टन), इटली (२,४५१.८४ टन), फ्रान्स (२,४३७ टन) आणि स्वित्झर्लंड (१,०३९.९४ टन) यांचा क्रमांक लागतो. भारतासह अनेक देश हे त्यांच्या सोन्याचा काही भाग लंडन आणि न्यूयॉर्कमधील बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीत ठेवतात.
7 / 7
अमेरिकेतील जवळजवळ निम्मे सोने फोर्ट नॉक्समध्ये ठेवले आहे परंतू अद्यापही या सोन्याचे ऑडिट झालेले नाहीय. तर फेडरल रिझर्व्ह बँकेच्या न्यू यॉर्कच्या तिजोरीतही प्रचंड सोन्याचा साठा आहे. ही तिजोरी मॅनहॅटनमधील रस्त्यापासून ८० फूट खाली बांधण्यात आली आहे.
टॅग्स :GoldसोनंDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका