Flipkart-Amazonवरुन खरेदी करताना 'हा' नंबर टाका, 8000 ते 10000 रुपयांची होईल बचत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:45 IST
1 / 8 सध्या Amazon आणि Flipkart या ऑनलाईन शॉपींग साइटवर तुम्हाला कुठल्याही वस्तुवर मोठ्या डिस्काउंटसह विविध ऑफर मिळतात.2 / 8 अनेकदा ₹ 40,000 ते ₹ 100000 रुपये किमतीच्या उत्पादनांवर भरघोस सूट दिली जाते, तर कधी कुठलीही सूट मिळत नाही.3 / 8 एखाद्या उत्पादनावर कुठलीही सूट मिळत नसेल, तरीदेखील तुम्ही त्यावर डिस्काउंट मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला असाच एका ट्रीकबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता.4 / 8 तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला ई-कॉमर्स साइटवर सर्व तपशील भरावे लागतात, तुमच्या पत्त्यासह पेमेंट पद्धतही निवडावी लागेल.5 / 8 तुम्ही ही सर्व माहिती ई-कॉमर्स साइटवर अपडेट केल्यानंतर तुम्हाला जीएसटी तपशील विचारला जातो. तुमच्याकडे जीएसटी क्रमांक असेल, तर त्याची माहिती भरुन तुम्ही एक उत्तम ऑफर मिळवू शकता.6 / 8 जेव्हा तुम्ही उत्पादनाच्या खरेदीदरम्यान GST तपशील भरता तेव्हा, उत्पादनाच्या खरेदीनंतर त्यातील सुमारे 28 टक्के रक्कम कॅशबॅकच्या रुपात परत केली जाते. 7 / 8 तुम्हाला किती कॅशबॅक दिला जाईल हे पूर्णपणे उत्पादनावर अवलंबून असते. पण, तुमच्याकडे जीएसटी क्रमांक असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला अशा प्रकारचा कॅशबॅक मिळणार नाही. 8 / 8 तुमच्याकडेही जीएसटी क्रमांक असेल, तर तुम्ही ही ट्रीक वापरुन पाहायला हवी. ही ट्रीक अजून ट्राय केली नसेल, तर आताच ट्राय करा आणि आपले हजारो रुपये वाचवा.