शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बँक घोटाळा भोवला! अनिल अंबानींचे मुंबईतील निवासस्थान जप्त; अलिशान घराची किंमत वाचून अवाक व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:19 IST

1 / 7
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर ईडीचा फास सातत्याने आवळला जात आहे. या कथित बँक फसवणूक प्रकरणात आतापर्यंत जप्त केलेल्या एकूण मालमत्तेचे मूल्य सुमारे १५,७०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
2 / 7
मुंबईतील पाली हिल येथे असलेले अनिल अंबानींचे 'एबोड' हे देशातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या घराची अंदाजित किंमत सुमारे ३,७१६ कोटी ते ५,००० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.
3 / 7
अनिल अंबानींचे हे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. हे घर १७ मजली असून सुमारे १६,००० स्क्वेअर फूट परिसरात पसरलेले आहे. या इमारतीची उंची ६६ मीटर असून ती देशातील सर्वात उंच खाजगी इमारतींपैकी एक आहे.
4 / 7
या आलिशान घराच्या छतावर स्वतःचे हेलिपॅड आहे. याशिवाय जिम, स्पा, स्विमिंग पूल आणि जगातील सर्व अत्याधुनिक सुखसोयी या इमारतीत उपलब्ध आहेत.
5 / 7
६६ वर्षीय अनिल अंबानी यांच्याकडे महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे. या गाड्या पार्क करण्यासाठी इमारतीमध्ये अवाढव्य जागा देण्यात आली असून घराचा लाउंज एरिया अतिशय वैभवशाली आहे.
6 / 7
ईडीने ही कारवाई धनशोधन प्रतिबंधक कायद्यांतर्गत केली आहे. सध्या अनिल अंबानी, पत्नी टीना अंबानी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब याच घरात वास्तव्यास आहे.
7 / 7
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू असूनही अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक आणि कायदेशीर संकटात सापडले आहेत. ईडीच्या या ताज्या कारवाईमुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयfraudधोकेबाजीReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन