शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दुबईतून तुम्ही १ किलो सोने देखील बिनदिक्कत आणू शकता; या आहेत 'वाटा', मग स्मगलिंग का करायचे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:59 IST

1 / 8
सोन्याची तस्करी करताना जेव्हापासून कर्नाटकच्या हिरोईन रान्याला पकडले आहे ना तेव्हापासून दुबईच्या सोन्याची तस्करी चर्चेत आली आहे. तशी दररोज विमानतळांवर सोन्याची तस्करी करताना पकडल्याच्या बातम्या येत असतात. परंतू, अभिनेत्री असलेल्या व्यक्तीने वारंवार दुबईला जाणे आणि तिकडून मिरवत, लपवत किलो किलोने सोने आणणे म्हणजे जरा चर्चेचेच प्रकरणे झाले.दुबईतून तुम्ही देखील सोने आणू शकता, रान्या रावसारखे पकडलेही जाणार नाही, पण त्यासाठी एक कायदेशीर मार्ग आहे.
2 / 8
तुम्ही जर समजा दुबईला गेलात किंवा कोणी ओळखीचे ये-जा करत असेल तर ते बिनदिक्कत सोने भारतात आणू शकतात. दुबईत सोने ८ ते १० टक्के स्वस्त आहे. यामुळे तिथून भारतात त्याची किलो किलोने स्मगलिंग केली जाते. अनेकांना वाटते दुबईला जावे आणि बॅग भरून सोने आणावे. परंतू, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही कस्टमच्या नियमांनुसार ते सोने भारतात आणू शकता. जर तुम्ही सोने आणताय हे जाहीर केले नाही, किंवा चुकीची माहिती दिली तर तुम्हाला मग कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागेल.
3 / 8
यामध्ये दंड, जप्ती आणि तुरुंग असा प्रवास घडू शकतो. आता यापासून वाचण्यासाठी नियम काय आहेत, ते पाहुया...
4 / 8
जर कोणी पुरुष दुबईहून सोने भारतात आणत असेल तर तो बिनदिक्कत २० ग्रॅम सोने आणू शकतो. त्यावर कस्टम ड्यूटी लागत नाही. जर या पुरुषाने २० ग्राम ते ५० ग्राम या वजनाचे सोने आणले तर त्याला ३ टक्के कस्टम ड्युटी भरावी लागते. ५० ते १०० ग्रॅममध्ये आणले तर ६ टक्के कस्टम ड्युटी भरावी लागते. १०० ग्राम पेक्षा जास्त आणली तर १० टक्के कर भरावा लागतो.
5 / 8
महिलांना जास्तीची सूट आहे. त्या आपल्यासोबत बिनदिक्कत ४० ग्राम सोने आणू शकतात. त्यापेक्षा जास्त ते १०० ग्राम सोने आणले तर ३ टक्के, १०० ते २०० ग्राम आणले तर ६ टक्के कर भरावा लागतो.
6 / 8
१५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी देखील जादा सोने आणण्याची मुभा आहे. ते आपल्यासोबत ४० ग्रास ड्युटी फ्री सोने आणू शकतात. परंतू, यासाठी त्या कुटुंबाला प्रमाण पत्र आणि नाते संबंधांचे पुरावे द्यावे लागतात.
7 / 8
तुम्ही तुमच्यासोबत १ किलो सोने देखील बिनदिक्कत आणू शकता. परंतू, त्यासाठी तुम्हाला दुबईत सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त वास्तव्य करावे लागेल. तसेच कस्टम ड्युटी भरावी लागेल. याचबरोबर सोन्याची पावती देखील दाखवावी लागते.
8 / 8
जर तुमच्याकडे ठरविल्यापेक्षा जास्त सोने असेल तर विमानतळावर रेड चॅनलच्या माध्यमातून ते जाहीर करावे लागते. ग्रीन चॅनल हा ड्युटी फ्री लिमिटमध्ये असलेल्या प्रवाशांसाठी असतो. आपल्याकडे किती सोने आहे ते जर सांगितले नाही तर कस्टम विभाग कारवाई करतो.
टॅग्स :DubaiदुबईGoldसोनं