केवळ १ रूपया देऊन मिळेल दुप्पट व्हॅलिडिटी; पाहा Airtel चा जबरदस्त प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 16:25 IST
1 / 15सध्या देशात दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. अनेक कंपन्या सातत्यानं काही ना काही नवे प्लॅन्स ग्राहकांसाठी आणत असतात. 2 / 15अशातच दिग्गज कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं काही नवे प्लॅन आणताना दिसतं. परंतु यातून आपण कोणता प्लॅन निवडावा याबद्दल अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो. 3 / 15परंतु आज आपण जाणून घेणार आहोत असा प्लॅन ज्यामध्ये केवळ १ रूपया अधिक देऊन तुन्ही दुप्पट व्हॅलिडिटी मिळवू शकता.4 / 15जर तुम्हाला ४०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज करू इच्छिता तर तुम्हाला यात दोन प्लॅन्स मिळतात. 5 / 15त्यापैकी एक म्हणजे ३९८ रूपये आणि दुसरा म्हणजे ३९९ रूपये. यामध्ये ३९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. 6 / 15तर ३९९ रूपयांच्या प्लॅनवर ग्राहकांना ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.7 / 15याचाच अर्थ १ रूपया अधिक देऊन तुम्ही अधिक व्हॅलिडिटी मिळवू शकता. दोन्ही प्लॅनमध्ये दररोज मिळणारा डेटा जरी कमी अधिक असला तरी एकूण मिळणारा डेटा मात्र तितकाच आहे. 8 / 15एअरटेलच्या ३९८ रूपयांच्या प्लॅनसोबत २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसंच यासोबत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसही दिले जातात. 9 / 15याशिवाय या प्लॅनमध्ये २८ दिवसांकरिता दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. याप्रकारे २८ दिवसांसाठी एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. 10 / 15या प्लॅनसोबत ग्राहकांना प्राईम व्हिडीओचा मोबाईल एडिशन अॅपचं ट्रायलदेखील मिळतं. 11 / 15याशिवाय Airtel Xstream Premium, हॅलो ट्युन्स, विंक म्युझिक, शॉ अकॅडमीचा मोफत कोर्स आणि FASTag च्या खरेदीवर १०० रूपयांचा कॅशबॅकही मिळतो.12 / 15एअरटेलच्या ३९९ रूपयांच्या प्लॅनसोबत ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसंच यात दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो. 13 / 15याप्रकारे युझर्सना ५६ दिवसांकरिता ८४ जीबी डेटा देण्यात येतो. याव्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही देण्यात येते. 14 / 15याशिवाय या प्लॅनसोबत प्राईम व्हिडीओचं ट्रायलही देण्यात येतं. 15 / 15Airtel Xstream Premium, हॅलो ट्युन्स, विंक म्युझिक, शॉ अकॅडमीचा मोफत कोर्स आणि FASTag च्या खरेदीवर १०० रूपयांचा कॅशबॅकही अशा सुविधाही या प्लॅनसोबतदेखील देण्यात येतात.