Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:28 IST
1 / 9Donald Trump's Tariffs : मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारतावर ५० टक्क्यांपर्यंत कर लावले आहेत. यामुळे भारतीय उद्योगांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था असे म्हटले होते. यामुळे आता अमेरिका आणि भारतामधील संबंध बिघडल्याचे दिसत आहे. 2 / 9अमेरिकेच्या या निर्णयानंतर देशात अमेरिकन ब्रँड्सविरुद्ध संताप निर्माण होत आहे. याआधी भारतीयांनी चीनच्या वस्तुंविरोधात संपात व्यक्त केला होता. त्याच भारताने आता अमेरिकेला उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.3 / 9गेल्या काही दशकांत, भारताने आपली आर्थिक ताकद वाढवली आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत उत्पादनांचा वाटा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.4 / 9अमेरिकेच्या या टॅरिफ निर्णयानंतर, भारतात मेड इन इंडियाला पाठिंबा देण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. सोशल मीडियावर व्यापारी आणि सामान्य ग्राहकांची परदेशी ब्रँडवर बहिष्कार टाकण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. 5 / 9भारत हा अमेरिकन कंपन्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बाजार पेठ आहे. येथील वाढत्या मध्यमवर्गीय आणि श्रीमंत ग्राहकांना आंतरराष्ट्रीय ब्रँडची पूर्वीपासून आवड आहे. मॅकडोनाल्ड्स, कोका-कोला, अमेझॉन, अॅपल सारखी नावे भारतातील दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेत. भारतात व्हॉट्सअॅपचा सर्वात मोठा वापरकर्ता वर्ग देखील आहे, तर डोमिनोजमध्ये येथे सर्वाधिक रेस्टॉरंट्स आहेत.या परिस्थितीत आता, जर भारतात अमेरिकन ब्रँड्सवरील बहिष्कार तीव्र झाला तर त्यामुळे या कंपन्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.6 / 9आता मेड इन इंडियाच्या समर्थनार्थ व्यावसायिकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. वॉव स्किन सायन्सचे सह-संस्थापक मनीष चौधरी यांनी एका व्हिडिओ संदेशात शेतकरी आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की आता मेड इन इंडियाला जगभर प्रसिद्ध करण्याची वेळ आली आहे. 7 / 9ड्राइव्हयूचे सीईओ रहम शास्त्री यांनी सोशल मीडियावर लिहिले की, भारतानेही चीनप्रमाणे स्वतःचे सोशल मीडिया आणि टेक प्लॅटफॉर्म विकसित करावेत, जेणेकरून ट्विटर, गुगल, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप सारख्या परदेशी सेवांवरील आपले अवलंबित्व कमी करता येईल. 8 / 9काल बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही कंपनीचे नाव न घेता सांगितले की, भारतीय तंत्रज्ञान कंपन्या जगासाठी उत्पादने बनवतात, परंतु आता देशाच्या गरजांना प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. त्यांच्या विधानामुळे सध्याच्या वातावरणात स्वावलंबी भारताचा संदेश आणखी बळकट होतो.9 / 9दरम्यान, भाजपशी संबंधित संघटना स्वदेशी जागरण मंचने रविवारी देशभरात निदर्शने केली आणि लोकांना अमेरिकन ब्रँडवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.