भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 17:55 IST
1 / 10मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात कर लादण्यास सुरुवात केली आहे. 2 / 10२४ टक्क्यांपासून सुरू झालेला कर आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर दुसरीकडे, आता ट्रम्प यांनी भारतीय औषध कंपन्यांना टॅरिफमधून सूट दिल्याचे समोर आले आहे. 3 / 10अमेरिकेत परवडणाऱ्या आरोग्यसेवा पुरवण्यात जेनेरिक औषधांचे महत्त्व लक्षात घेता, ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या तात्काळ शुल्क वाढीतून भारतीय औषध उद्योगाला सूट देण्यात आली.4 / 10भारत रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या कारणावरुन अमेरिकेने हे कर लादले होते.5 / 10अमेरिकेत परवडणाऱ्या आरोग्यसेवा राखण्यासाठी जेनेरिक औषधे महत्त्वाची असल्याने भारतीय औषध उद्योगाला अमेरिकेच् टॅरिफ मधून तात्काळ शुल्क अंमलबजावणीतून वगळण्यात आली, असं सांगण्यात येत आहे. 6 / 10जेनेरिक औषधे सामान्यतः खूप कमी नफ्यावर चालतात. अमेरिकेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी जेनेरिक औषधांची सतत उपलब्धता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.7 / 10अमेरिकेच्या औषध आयातीत भारताचा वाटा सुमारे ६ टक्के आहे, ५० टक्के शुल्कानंतर, भारतीय औषध निर्यातदारांनी त्यांचे शिपमेंट ऑस्ट्रेलियाला हलवण्यास सुरुवात केली, जे अमेरिकन मेडिकेअर प्रणालीच्या स्थिरतेसाठी धोकादायक मानले जात होते.8 / 10यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषधांना ५०% शुल्कातून सूट दिली.9 / 10अमेरिका औषध पुरवठ्यासाठी भारतावर अधिक अवलंबून आहे. अमेरिकेतील जवळजवळ अर्धी जेनेरिक औषधे भारतातून येतात.10 / 10आरोग्यसेवेची महत्त्वाची भूमिका आणि अमेरिकेतील आधीच जास्त आरोग्यसेवा खर्च पाहता, औषधांवर त्वरित जास्त शुल्क लावण्याची शक्यता कमी आहे, असा तज्ञांचा असा विश्वास आहे.