1 / 6रिलायन्स इंडस्ट्रीजला कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्रत्येकानं कधी ना कधी रिलायन्स आणि मुकेश अंबानी हे नाव ऐकलंच असेल. मुकेश अंबानी देशातील आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही आहेत. पण याच रिलायन्सची सुरुवात धीरुभाई अंबानी या नावानं परिचित असलेल्या त्यांच्या वडिलांनीच केली. 2 / 6रिलायन्स इंडस्ट्रीजनं कापड निर्मितीपासून सुरुवात केली आणि नंतर पेट्रोकेमिकल व्यवसायात नाव कमावलं. त्यानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी वेगळे झाले, मग मुकेश अंबानी यांनी त्याच रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठं केलं. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहानं सध्या ओटुसीसोबत रिटेल, तसंच टेलिकॉम सह टेक क्षेत्रात विस्तार केला आहे.3 / 6आज प्रश्न केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विकासाचा आणि मुकेश अंबानींच्या नेतृत्वाचा नाही. किंबहुना हा प्रश्न त्याहूनही मोठा आणि महत्त्वाचा आहे. धीरूभाई अंबानी यांचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का? होय, रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी म्हणून जे जग ओळखतं, ते त्यांचं खरं नाव नाही. विशेष म्हणजे अनेकांना त्यांचं खरं नाव माहित नसेल. त्याचबरोबर त्यांनी कोणत्या वयात रिलायन्सचा पाया रचला, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपण या दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.4 / 6अंबानी हे त्यांचं आडनाव आहे. पण धीरूभाई हे त्यांचं खरं नाव नव्हतं. हे त्याचं टोपणनाव आहे, ज्यानं लोक प्रेमानं त्यांना हाक मारत असत. पण त्याचं खरं नाव काय हा खरा प्रश्न आहे. धीरजलाल हीरालाल अंबानी असं धीरुभाई अंबानी यांचं खरं नाव. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी झाला. ६ जुलै २००२ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण निधनापूर्वी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला देशातील सर्वात मोठी कंपनी बनवलं. देशातच नव्हे तर जगभरात त्यांनी आपल्या कंपनीचा विस्तार केला.5 / 6धीरजलाल हीरालाल अंबानी म्हणजेच धीरूभाई अंबानी यांनी कोणत्या वयात रिलायन्सची सुरुवात केली हे तुम्हाला माहित आहे का? धीरूभाई अंबानी यांनी १९५८ साली रिलायन्स इंडस्ट्रीजची पायाभरणी केली. त्यावेळी त्यांचं वय केवळ २५ वर्षा होतं. त्यानंतर रिलायन्स मोठी होत गेली. एवढ्या कमी वयात स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे, एवढ्या उंचीवर पोहोचलेले लोक देशात फार कमी आहेत. 6 / 6नुकतीच स्टॅटिकानं एक यादी जाहीर केली आहे, ज्यात अशा व्यावसायिकांची नावं आहेत ज्यांनी कमी वयात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि ब्रँड म्हणून प्रस्थापित केला. या यादीत बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग आणि ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचाही समावेश आहे, ज्यांनी वयाच्या २१-२२ व्या वर्षी आपला व्यवसाय सुरू केला. त्यानंतर धीरूभाई अंबानी म्हणजेच धीरजलाल हीरालाल अंबानी यांचं नाव आहे.