शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Dolly Chaiwala : 'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 09:10 IST

1 / 7
डॉली चायवाला हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला डॉली चायवाला बिल गेट्स यांच्या भेटीनंतर तर आणखीच प्रसिद्धीझोतात आला. पण सध्या नागपूरच्या या डॉली चायवालाची फी ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कुवैतच्या एका व्लॉगरनं त्याच्या फी बद्दल मोठा दावा केलाय.
2 / 7
डॉली चायवाला एका कार्यक्रमातील उपस्थितीसाठी ५ लाख रुपये फी घेत असल्याचा दावा त्यानं केलाय. हा दावा तेव्हा समोर आला जेव्हा एक डिजिटल क्रिएटर तैयब फखरुद्दीन याच्यासोबत एका चर्चेदरम्यान कुवैतच्या एका व्लॉगरनं खुलासा केला. एके फूड व्लॉग नावाच्या व्लॉगरनं डॉली चायवालाला आमंत्रित करण्याचा अनुभव शेअर केला.
3 / 7
व्हिडीओमध्ये व्लॉगरनं सांगितलं की, डॉली चायवाला प्रत्येक उपस्थितीसाठी ५ लाख रुपये घेतो. याशिवाय डॉली चायवाला ४ किंवा ५ स्टार हॉटेलमध्ये राहतो, असा दावाही त्या व्लॉगरनं केलाय. अपॉईंटमेंटसाठी त्यानं एक मॅनेजरचीदेखील नेमणूक केल्याचं त्यांनं सांगितलं.
4 / 7
'मला त्याला कुवैतला बोलवायचं होतं. परंतु त्याची मागणी अतिशय मोठी होती. तुम्ही या मागण्यांबाबत गंभीर आहात का असा प्रश्न मी विचारणार होतो. तो माझ्याशी बोलतही नव्हता. त्याचा मॅनेजर माझ्याशी बोलत होता. त्यानं एक मॅनेजरही नियुक्त केला आहे,' असं तो व्लॉगर व्हिडीओमध्ये बोलताना दिसतो.
5 / 7
व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालीये. 'खरं तर त्याला दोष देता येणार नाही. त्याचंच नाव घेऊन तुम्हाला एक मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तो मार्केटिंगमध्ये चांगला आहे,' असं एका युझरनं म्हटलं. तर दुसरीकडे एकानं तुम्ही त्याला कुवैतला का बोलवाल? असा प्रश्न केला. तर आणखी एकानं तो तुमच्यापेक्षा अधिक प्रसिद्ध आहे, तुम्ही कोण आहात? अशा सवाल केला.
6 / 7
डॉली चायवाला हा नागपूरचा एका चहा विक्रेता आहे. आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये चहा बनवतानाचे त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोन्याची चेन आणि अनोखी हेअरस्टाईल ही त्याची ओळख बनलीये. डॉली की टपरी नागपूर या त्याच्या इन्स्टाग्राम पेजचे ४२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. बिल गेट्स यांच्या भेटीपासून तर तो चर्चेत आला आहे.
7 / 7
बिल गेट्स यांनी भारत भेटीदरम्यान डॉली चायवालाच्या टपरीलाही भेट दिली होती. डॉली चायवालाच्या टपरीवर बिल गेट्स चहा पितानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. नागपूरच्या रस्त्यावर चहा विकणाऱ्या डॉली चायवालाच्या अनोख्या स्टाइलमुळे तो नेहमी चर्चेत असतो.
टॅग्स :nagpurनागपूरbusinessव्यवसाय