पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
By जयदीप दाभोळकर | Updated: September 5, 2025 09:32 IST
1 / 5Post Office Investment: गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पर्यायामध्ये गुंतवणूक करता. पोस्ट ऑफिसचे नॅशनल सेव्हिंग्ज रिकरिंग डिपॉझिट अकाउंट (National Savings Recurring Deposit Account) ही अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही छोट्या हप्त्यांसह भविष्यासाठी मोठा फंड तयार करू शकता.2 / 5या योजनेत गुंतवणूकदार दरमहिन्याला ठराविक रक्कम जमा करू शकतो. किमान गुंतवणूक फक्त १०० रुपये आहे आणि त्यानंतर कोणतीही रक्कम १० च्या पटीत जमा केली जाऊ शकते. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवी तेवढी रक्कम टाकू शकता.3 / 5पोस्ट ऑफिसआरडी स्कीम ५ वर्षांसाठी आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं दरमहा ४००० रुपये जमा केले तर ५ वर्षांनंतर त्याच्या खात्यात एकूण ₹ २,८५,४५९ जमा होतील. यापैकी २,४०,००० रुपये आपण जमा केलेली रक्कम असेल आणि उर्वरित ४५,४५९ रुपये व्याज म्हणून मिळतील. सरकारकडून यावर वेळोवेळी व्याजदर निश्चित केला जातो आणि त्याची हमी दिली जाते.4 / 5पोस्ट ऑफिसआरडी योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात जमा होणारी रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते. बाजारातील जोखीम नाही आणि व्याजदरावर सरकारची हमीदेखील मिळते. त्यामुळे लघु आणि मध्यम गुंतवणूकदारांसाठी हा उत्तम पर्याय मानला जात आहे.5 / 5जर तुम्हाला ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हवं असेल तर तुम्ही हे अकाऊंट आणखी ५ वर्षांसाठी वाढवू शकता. एवढंच नाही तर मॅच्युरिटी डेटच्या पुढे ही रक्कम तुम्ही अतिरिक्त गुंतवणूक न करता ५ वर्षांसाठी चालू ठेवू शकता.