SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:30 IST
1 / 7SBI Saving Schemes रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) यावर्षी रेपो दरात १.२५ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयनं डिसेंबरमध्येही रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी केला, ज्यामुळे तो ५.२५ टक्क्यांवर आला आहे. रेपो दरात झालेल्या या कपातीनंतर बँकांनी एफडीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरातही कपात केली आहे.2 / 7देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं (SBI) देखील काही निवडक एफडी योजनांवरील व्याजदर कमी केले आहेत. मात्र, काही विशिष्ट कालावधीच्या एफडी योजनांवर पूर्वीप्रमाणेच भरघोस व्याज मिळत राहणार आहे. 3 / 7आम्ही तुम्हाला एसबीआयच्या अशाच एका जबरदस्त एफडी योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेत केवळ २ लाख रुपये जमा करून, हमीसह ८३,६५२ रुपयांपर्यंतचे निश्चित व्याज मिळू शकतं.4 / 7 भारतीय स्टेट बँकेत ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येते. एसबीआय एफडी खात्यांवर ३.०५ टक्के ते ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. देशातील ही सर्वात मोठी सरकारी बँक ४४४ दिवसांच्या 'अमृत वृष्टी स्पेशल एफडी स्कीम'वर सामान्य नागरिकांना सर्वाधिक ६.४५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ६.९५ टक्के व्याज देत आहे.5 / 7एसबीआय ५ वर्षांच्या एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.०५ टक्के व्याज देत आहे. तर ५ वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.०५ टक्के परतावा दिला जात आहे.6 / 7जर तुम्ही सामान्य नागरिक (म्हणजे ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे) असाल आणि तुम्ही एसबीआयमध्ये ५ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,७०,०३५ रुपये मिळतील. यात तुमच्या व्याजाचे निश्चित ७०,०३५ रुपये देखील समाविष्ट आहेत.7 / 7त्याचप्रमाणे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक (म्हणजे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे) असाल आणि तुम्ही एसबीआयमध्ये ५ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,८३,६५२ रुपये मिळतील. यात ८३,६५२ रुपयांचे निश्चित व्याज देखील समाविष्ट आहे.